शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांनो, शेतकऱ्यांबाबत खबरदारी घ्याच

By admin | Updated: January 19, 2016 00:41 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषिक्षेत्राचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे.

कल्पना बोरकर यांचा सल्ला : बल्लारपुरात कृषी विभागाची आढावा सभाबल्लारपूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषिक्षेत्राचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. शेती उत्पादनात वाढ होणे क्रमप्राप्त आहे. यासाठी कृषी क्षेत्रात नियोजनपूर्वक विकासाची गरज आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या योजना सांगून त्याची अंमलबजावणी करावी, ग्रामसेवकांनो, शेतकऱ्याबाबत खबरदारी घ्याच, असा निर्वाणीचा सल्ला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती कल्पना बोरकर यांनी शनिवारी येथील कृषी विभागाच्या आढावा सभेत दिला.बल्लारपूर पंचायत समितीच्या कृषी विभागाने येथील सभागृहात आढावा सभा घेतली. सभेला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी यांच्याकडून कृषी विभागाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.सभेच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती अनेकश्वर मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरु, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रविण देशमुख, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, किन्ही येथील सरपंच जीवनकला आलाम यांची उपस्थिती होती. दरम्यान, कल्पना बोरकर यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करुन चंद्रकला बोबाटे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजनाची माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे, सदर योजनेतील लाभार्थ्यांचे सन २०१५-१६ चे लक्षांक ८० शेतकरी असताना प्रत्यक्षात केवळ १८ शेतकऱ्यांनीच अर्ज सादर केल्याने प्रविण देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. लक्षांक पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पंचायत कृषी विभागाला दिले. तालुक्यातील ६ हजार ३०८ शेतकऱ्यांची संख्या असताना लाभार्थी शेतकरी कसे मिळत नाही, असेही त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सुनावले. संचालन पंचायत कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी केले. आभार पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)