शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम सडक योजनेला निधी कमी पडू देणार नाही

By admin | Updated: January 25, 2016 01:28 IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्हयात या

चंद्रपूर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्हयात या वर्षी ७४ किलोमीटर तर पुढील वर्षी ९२ किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात येणार आहे. या योजनेतील रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जिल्ह्यातील विविध विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज शनिवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नाना शामकुळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा पालक सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम असावी यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा नियोजनांतर्गत निधी वाटपासाठी असलेली कोअर, नॉनकोअर मर्यादा शिथील करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. हुमन प्रकल्प लवकर सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बाबुपेठ उड्डाण पुलाची सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यासाठी त्यांनी नगर विकास खात्याच्या सचिवांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.या बैठकीत जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती, महानगर पालिका अंतर्गत विविध कामांचा आढावा, महानगरपालिका-नगरपालिका पायाभूत सोई-सुविधा विशेष निधी, बाबुपेठ उड्डाण पुल, दाताळा येथे म्हाडातर्फे ब्रिज बांधणे, जिल्हा वार्षिक योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प इत्यादी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती प्राधान्याने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दुरुस्तीसंदर्भातील शासन निर्णयामध्ये असलेल्या त्रुटी तत्काळ दूर कराव्यात अशा सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पालक सचिवांना दिल्या. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली असून या गावात ४ हजार २२९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर ८३१ कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित ३ हजार ८२७ कामे मार्चअखेर पूर्ण करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. जलयुक्त शिवारच्या पूर्ण झालेल्या कामातून १४ हजार ४७४ टिसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून ३ हजार १६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र झाले आहे. पुढील वर्षी २६३ गावांची निवड करण्यात येणार असून यामध्ये जनवन योजनेतील ५० गावांचा समावेश करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)