शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

४१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : तालुक्यात ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ५६ पैकी ४१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागभीड : तालुक्यात ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ५६ पैकी ४१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या. पुरेशी गणपूर्ती हे यामागील कारण आहे. परिणामी प्रथमच ग्रामसभेला सामोरे नवनियुक्त सरपंचांचा चांगलाच हिरमोड झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांना शिथिलता देण्यात आल्यानंतर दीड वर्षांनी प्रथमच ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी नागभीड तालुक्यात ग्रामसभा होणार होत्या. मात्र पुरेशा गणपूर्ती अभावी या ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या. नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. सहा महिन्यांपूर्वी यातील ४३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या ग्रामपंचायतींच्या बहुतेक सरपंचांना ग्रामसभा विषयी उत्सुकता होती. यात २१ महिला सरपंचांचा ही समावेश होता.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामसभांचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरून त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची तरतुद आहे. मात्र कोरोनामुळे ग्रामसभा घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते.

आता कोरोनाचे रूग्ण कमी झाल्यानंतर शासनाकडून अनेक बाबींवरील निर्बंध हटविण्यात आले. यात ग्रामसभांचा ही समावेश होता. विविध अटी आणि शर्तीचे पालन करून ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घ्याव्यात अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार या ग्रामसभा ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी होणार होत्या. मात्र पुरेशा गणपूर्ती अभावी या ग्रामसभा तहकूब कराव्या लागल्या. आता या तहकूब ग्रामसभा सप्टेंबर महिन्यात पार पडतील.

कोट

तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. सर्वच ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. यातील १५ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा परिपूर्ण गणपूर्ती झाल्याने संपन्न झाल्या. बाकीच्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा गणपूर्ती अभावी होऊ शकल्या नाही. त्या ७ दिवसांचे आत घेण्यात येतील.

- संजय पुरी, गटविकास अधिकारी नागभीड.