शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यांनाही आता येणार ‘अच्छे दिन’

By admin | Updated: July 26, 2015 01:34 IST

ग्रामपंचायतींना मिळणार थेट निधी : मासिक सभांना आर्थिक खर्चाने अधिकार

खडसंगी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांच्या मागे लागून ग्रामपंचायतीचे कामे मागण्याचा काळ आता मागे पडणार आहे. थेट ग्रामपंचायतींनाच लोकसंख्येच्या तुलनेत कोट्यवधीचा निधी मिळणार असल्याने यापुढे ग्रामपंचायत सदस्यांनाही ‘अच्छे दिन’ येणार आहेत. त्याचेच चित्र आताच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या उमेदवारांच्या संख्येवरुन पहायला मिळत आहे.यापूर्वी वित्त आयोगाच्या निधीसाठी पंचायत राज संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेनुसार कारभार सुरू होता. त्यामुळे आमदार- खासदाराप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या मदतीनेच ग्रामपंचायतीच्या सरपंचांना गावासाठीचा विकास निधी मिळत होता. मात्र आता चौदाव्या वित्त आयोगासह इतरही केंद्र व राज्य सरकारच्या योजनातून थेट ग्रामपंचायतीवरच कोट्यवधी रुपयांच्या निधीचा पाऊस पाडण्याची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी होणार आहेत. त्यानुसार आता सरपंचांना फक्त आमदार- खासदारांच्या पुढे- पुढे करुन निधी मिळू शकतो.कारण जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून एक कवडीही मिळणार नसल्याने आतापर्यंत येथील सदस्यांना असणारा भाव पूर्ण कमी होणार आहे. आतापर्यंत एक हाथी कारभार हाकणाऱ्या सरपंचांना, ग्रामपंचायत सदस्यांनाही हाताशी धरुनच विकास कमााचा निधी खर्च करावा लागणार आहे.याच मार्गदर्शक तत्वामुळे सध्या जिल्ह्यात बोलबाला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेतही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे चित्र उमेदवारांच्या संख्येवरुन दिसून येत आहे. जिल्हाभर सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकात सरपंचासह आता सदस्य होण्यासाठी साम-दाम- दंड- भेद या मार्गाचा अवलंब करण्यासाठी तरुणाई सरसावल्याचे चित्र मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये दिसत आहे.अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढल्याने गावपुढाऱ्यांची मोठी पंचाईत झालेली आहे. आतापर्यंत मतदारांना चिरीमिरी देऊन सरपंच पद पदरात पाडून लाखो रुपयांची कमाई करण्यात व सदस्यासह ग्रामस्थांनाही हुलकावणी देण्याचेच धोरण सुरू होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकांना महत्त्व येणार आहे. (वार्ताहर)