शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण

By admin | Updated: September 7, 2015 01:16 IST

तालुक्यातील खराळपेठ येथील ग्रा.पं. निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये तीन वेगळ्या पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने राजकीय खेळीतून मर्यादा ओलांडत ...

पोलिसात तक्रार : अपहरणकर्त्यांविरूद्ध गुन्हा नोंदगोंडपिपरी : तालुक्यातील खराळपेठ येथील ग्रा.पं. निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये तीन वेगळ्या पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने राजकीय खेळीतून मर्यादा ओलांडत एका ग्रा.पं. सदस्याचे अपहरण करून तब्बल तीन तासाने त्याची सुटका करण्यात आली. याची तक्रार पोलिसात देण्यात आली असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून आरोपी अपहरणकर्त्याविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या खराळपेठ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यात माजी सरपंच अभय आबाजी शेंडे यांच्या गटाचे ५, सोमनाथ खारकर गटाचे ३ तर सुधीर अवधरे गटाचा १ सदस्य निवडून आले. आगामी ७ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अभय शेंडे गटाचा विजय निश्चित असल्याचे पाहून आज सकाळी ९.३० वाजताचे दरम्यान नवनियुक्त ग्रा.पं. सदस्य अभय शेंडे हे गोंडपिपरीकडे आपल्या दुचाकी वाहनाने जात असतांना त्यांना खराळपेठ बसस्थानकावर अडवून वाहनात कोंबण्यात आले. सुधीर अवथरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरण करून नेल्याची तक्रार अभय शेंडे यांच्या पत्नीने गोंडपिपरी पोलिसात दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता घटनेच्या वेळेपासून तब्बल तीन तासाने अभय शेंडे हे खराळपेठ बसस्थानकावर पोहोचले. तत्पूर्वी अभय शेंडे यांच्या भ्रमणध्वनीवर अनेकांनी संपर्क साधला असता, फिरण्यासाठी नजिकच्या आष्टी या गावी गेल्याची माहिती मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र यानंतर या नाट्यमय अपहरण प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. गावातील काही नागरिक व अभय शेंडे यांनी गोंडपिपरी पोलीस ठाणे गाठून चाकूचा धाक दाखवून विरोध पॅनलचे सुधीर व जगदीश अवथरे व वाहन चालक यांनी आपले अपहरण केल्याची कबुली दिली. तसेच जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्याची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी आरोपी सुधीर व जगदीश अवथरे यांचेवर भादंवि कलम ३६३, ३६५ (३४), १७१ (क) (ख) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. घटनेचा तपास गोंडपिपरी पोलीस करित असून आरोपीचा अद्यापही शोध लागला नाही. (तालुका प्रतिनिधी)