शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शिक्षकांना शाळाबाह्य कामाची सक्ती करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:15 IST

आरटीई कायद्यानुसार शिक्षकांना स्थानिक प्राधिकरण राज्य विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या कर्तव्याखेरीज इतर कोणतीही शिक्षकेत्तर कामे देण्यात येऊ नये, असे नमूद आहे.

ठळक मुद्देविमाशि संघाची मागणी : मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आरटीई कायद्यानुसार शिक्षकांना स्थानिक प्राधिकरण राज्य विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या कर्तव्याखेरीज इतर कोणतीही शिक्षकेत्तर कामे देण्यात येऊ नये, असे नमूद आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक खासगी संस्थेतील शिक्षकांना बीएलओ काम करण्यासंबंधीचे पत्र शाळांना मिळाले. यामुळे शैक्षणिक कामावर परिणाम होणार आहे. शासनाने शिक्षकांना शाळाबाह्य कामे देण्याची सक्ती करू नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केली आहे.आरटीई अ‍ॅक्टनुसार शाळाबाह्य कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये, असा स्पष्ट उल्लेख आहे. निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार बीएलओ काम फक्त कॉन्ट्रॅक्ट टीचर्स यांना देण्यात यावे, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र शाळाबाह्य कामासाठी खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. एक वर्षापूर्वी शाळाबाह्य कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये, याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिले होते. त्यावेळी बीएलओचे काम शिक्षकांना देण्यात येणार नाही, असे तोंडी अभिवचन शिष्टमंडळास दिले होते. मात्र शासनाने ते पाळले नाही. शिक्षकांना शाळाबाह्य कामाच्या मानसिक दबावातून मुक्त करावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, लक्ष्मण धोबे, दिगंबर कुरेकर, मनोज वसाडे यांच्यासह बीएलओचे काम देण्यात आलेले शिक्षक उपस्थित होते.