शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या योजना गरिबांच्या सक्षमीकरणासाठी

By admin | Updated: August 27, 2016 00:35 IST

सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र व राज्य सरकार गरिबांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक लोकाभिमूख योजना राबवित आहे.

चंदनसिंह चंदेल: बल्लारपुरात पार पडले शिबिरबल्लारपूर: सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र व राज्य सरकार गरिबांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक लोकाभिमूख योजना राबवित आहे. यातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनस्तरावरुन केला जात आहे. समाजातील दुर्बल घटकांचे शासनाच्या योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी फायदेशीर ठरणारे आहे, असे प्रतिपादन वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.येथील संत गाडगेबाबा वाचनालयात संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेच्या वतीने स्थानिक सुभाष वॉर्डात सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची माहिती देण्याच्या अनुषंगाने बुधवारी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष रेणुका दुधे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर, भाजपाच्या नगरसेवक वर्षा सुंचूवार, वैशाली जोशी, संत गाडगेबाबा महाराज जनसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, राकेश यादव यांची उपस्थिती होती.तहसीलदार विकास अहीर मार्गदर्शन करताना म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून शासन सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. यातील संजय गांधी निराधार योजना विधवा, अपंग, दुर्धर आजाराने पीडितासाठी अन्य वंचित घटकांना आर्थिक मदत मिळून आत्मनिर्भर करण्यासाठी राबविली जाते. कुटुंब अर्थ सहाय्य योजनेच्या माध्यमातून बिपीएल प्रमाणपत्र धारक विधवांना मदत दिली जाते. सदर शिबिर लाभार्थ्यांना फायद्यासाठी असून वंचितांना यातून लाभ मिळण्यास सुलभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन श्रीनिवास सुंचूवार यांनी तर आभार राकेश यादव यांनी मानले. प्रदीप पाठक, सुरज बहुरिया, रामजन्म चक्रवर्ती, योगेश शेट्टी, दीपक वर्मा, प्रमोद शाहू, श्रीकांत इटनकर, शितल निषाद, आशा निषाद, अजय मंगरुळकर यांनी शिबिराला सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)