शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा महसूल घटला

By admin | Updated: January 22, 2017 00:53 IST

जिल्ह्यात कोषागार कार्यालयाकडे असलेली सर्व जमा रक्कम, मुद्रांक विक्री आणि नोंदणी फीच्या माध्यमातून शासनाला महसूल प्राप्त होत असतो.

मुद्रांक शुल्क व नोंदणी फी : डिसेंबर महिन्यातील उत्पन्न ४ कोटींनी कमीचंद्रपूर : जिल्ह्यात कोषागार कार्यालयाकडे असलेली सर्व जमा रक्कम, मुद्रांक विक्री आणि नोंदणी फीच्या माध्यमातून शासनाला महसूल प्राप्त होत असतो. त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबर महिन्यातील उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी ७ कोटी ७४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी त्यामध्ये ६० टक्क्यापर्यंत कपात होऊन केवळ ३ कोटी ७६ लाख रुपये झाले आहे.जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे व्यवहारासह अनेक प्रकारच्या शासकीय फीची रक्कम मुद्रांक शुल्क विभागाकडे जमा होत असते. ती रक्कम शासनाच्या तिजोरी जमा करण्यात येत असते. त्याचा अहवाल शासनाकडे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात येत असतो. राज्यातील सर्व मुद्रांक शुल्क कार्यालयाकडून मिळणाऱ्या उत्पन्नावरून राज्य शासनाच्या महसुलात भर पडत असते. राज्य उत्पादन शुल्क विभाग, विक्री कर आदींप्रमाणेच मुद्रांक शुल्क विभाग हादेखील शासनाच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे.केवळ डिसेंबर महिन्यातच उत्पन्न कमी झाले असून नसून नोव्हेंबर महिन्यातदेखील मुद्रांक शुल्काचे उत्पन्न कमी झाल्याचे आढळून आले. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम जिल्ह्यातील जमीन व मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर झाला आहे. त्यातून मंदीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे मुद्रांकातून मिळणाऱ्या उत्पन्नातही घट झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत २०१५मध्ये ५४ कोटी ८९ लाख २४ हजार ३८९ रुपये उत्पन्न झाले होते. तर याच कालावधीत २०१६मध्ये ४७ कोटी ५८ लाख ४८ हजार ८२२ रुपयांचे उत्पन्न झाले. त्यामध्ये २०१५च्या नोव्हेंबर महिन्यात एकूण ११ कोटी ८२ लाख ८६ हजार ६६२ रुपयांचे उत्पन्न झाले होते. याच २०१६च्या नोव्हेंबर महिन्यात सर्व प्रकारचे उत्पन्न मिळून ८ कोटी ६७ लाख ८७ हजार १०६ रुपये जमा झाले. डिसेंबर-२०१५मध्ये ७ कोटी ७४ लाख ४ हजार ९४४ रुपये जमा झाले होते. तर डिसेंबर-२०१६मध्ये ३ कोटी ७५ लाख ८४ हजार ८०१ रुपये जमा झाले आहेत. (प्रतिनिधी)शासनाचे उत्पन्नाचे मार्गकोषागाराकडे जमा असलेली रक्कम, कोषागारातून विक्री करण्यात आलेले न्यायिक आणि न्यायिकेत्तर मुद्रांक, दुय्यम निबंधक व सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात फ्रँकिंगद्वारे जमा होणारी रक्कम, ई-चलनाद्वारे जमा होणारी रक्कम, अभिनिर्णयाद्वारे जमा होणारी रक्कम, नोंदणी विवाह फी, नोंदणी फी इतर माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा समावेश शासनाच्या महसुलात होत असते.दस्त नोंदणीतही घटमुद्रांक शुल्क आणि नोंदणी फीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत असतानाच दस्त नोंदणीदेखील यावर्षी डिसेंबर महिन्यात कमी झाली. डिसेंबर-२०१५ मध्ये २ हजार २९७ दस्त नोंदणी करण्यात आली होती. यावर्षी डिसेंबर-२०१६मध्ये १ हजार १०८ दस्त नोंदणी करण्यात आली.