शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्यांनी परिवर्तनवादी चळवळ गतिमान करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:24 IST

आजच्या परिस्थितीत बहुतेक लोक राजकारणापासून दूर आहेत. अशा व्यक्तींनी अराजकीय भूमिका वठवावी. तर शिक्षित कर्मचाऱ्यांनी आरामदायी जीवन सोडून परिवर्तनवादी चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.

ठळक मुद्देसुरेश माने : बामसेफचे राज्यस्तरीय अधिवेशन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आजच्या परिस्थितीत बहुतेक लोक राजकारणापासून दूर आहेत. अशा व्यक्तींनी अराजकीय भूमिका वठवावी. तर शिक्षित कर्मचाऱ्यांनी आरामदायी जीवन सोडून परिवर्तनवादी चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.‘मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया’ या १८ मार्च १९५६ च्या डॉ. बाबासाहेबांच्या भाषणाच्या समर्थनार्थ व कांशिराम यांच्या ८४ व्या जयंतीचे औचित्य साधून बामसेफचे संमेलन स्नेहबंध सभागृह ऊर्जानगर येथे नुकतेच पार पडले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.अधिवेशनाचे उद्घाटन माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय मार्गदशर्क सुरेश माने उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना इ. झेड. खोब्रागडे यांनी कांशिराम यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. फुले आंबेडकरी चळवळीत काम करणाºयांनी निडरपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.संमेलनातील पहिल्या सत्रात ‘बहुजन समाज घटकाची राजकीय आर्थिक शैक्षणिक व शासकीय भागीदारीचे भवितव्य’ या विषयावर डॉ. विनोद शेवरीया (म.प्र) तसेच धम्मानंद मनवर नागपूर यांनी मार्गदर्शन केले. तसेच राज्य घटनात्मक लोकशाही, न्यायव्यवस्था व निवडणूक यंत्रणा यांना उद्ध्वस्त केले जात आहे काय, या विषयावर अ‍ॅड. भुपेंद्र रायपूरे, भद्रावती, नंदा फुकट नागपूर, मुंबई उच्च न्यायालयाच्या अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी हुकूमशाहीच्या आधारावर न्याय व्यवस्था, निवडणूक यंत्रणा व घटनात्मक लोकशाही कशी उद्ध्वस्त केली जात आहे, यावरच विचार मांडले. यावेळी बामसेफच्या वतीने अ‍ॅड. डॉ. सुरेश माने, दशरथ मडावी यांना एक लाख ६० हजार रुपये चळवळ निधी सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विदर्भ प्रदेश समन्वयक इंजि. विजय दुपारे यांनी तर आभार डी. यू. केळझरे यांनी मानले.