शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या आर्थिक उत्थानासाठी सरकार कटीबद्ध

By admin | Updated: August 22, 2016 01:54 IST

विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून जनतेची आर्थिक संपन्नता साध्य आणि त्यांचा आर्थिक उत्थान

हंसराज अहीर : ‘स्वातंत्र्याची ७० वर्ष; शहिदांचे स्मरण’ कार्यक्रमभद्रावती : विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून जनतेची आर्थिक संपन्नता साध्य आणि त्यांचा आर्थिक उत्थान करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असून जनतेनेसुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे आयोजित ‘स्वातंत्र्याची ७० वर्ष - शहीदांचे स्मरण’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.सांसद आदर्श ग्राम असलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने कर्मवीर विद्यालयात आयोजित ‘स्वातंत्र्याची ७० वर्ष - शहीदांचे स्मरण’ या विशेष कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, माजी आमदर संजय देवतळे, भद्रावती पंचायत समितीच्या सभापती इंदु नन्नावरे, क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूरचे क्षेत्रीच प्रचार अधिकारी मनोज सोनोने, चंदनखेडाच्या सरपंच गायत्री डेविस बागेसरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, शेतकऱ्यांना केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतीला पुरक असलेल्या जोडधंद्यांकडे वळण्याची गरज असून मुद्रा योजनेअंतर्गत रेशिम उद्योग, मधमाशी पालन, दुध डेरी यासारख्या पुरक व्यवसायाचा स्वीकार केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा आत्मविश्वास अहीर यांनी व्यक्त केला.बँकांनी मागेल त्याला कर्ज देण्याचे प्रयत्न करावे, असे सांगून ना. हंसराज अहीर म्हणाले की, सरकार विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु सरकारच्या सोबतच आर्थिक उत्थानाची जबाबदारी लोकांचीसुद्धा असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी बँक आॅफ महाराष्ट्राच्या चोरा शाखेच्या वतीने गजानन ठाकरे या लाभार्थ्यास पुनर्गठीत पीक कर्ज या योजनेतून अडीच लाख तसेच दिनेश निमजे यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून नव्वद हजाराचे अर्थ साहित्याचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह हे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, स्वातंत्रविरांच्या बलिदानातून आपणास स्वतंत्र प्राप्त झाले. छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेवून एक आदर्श ग्राम बनविण्याचा संकल्प याप्रसंगी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी माजी मंत्री संजय देवतळे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यांनी केले.यावेळी बँक आॅफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक संजय हिरेमठ यांनी मुद्रा योजना, अटल पेंशन योजना याची उपस्थितांना माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी बी.सी. राजवाडे यांनी पीक विमा योजना, चंद्रपूर येथील आयटीआयचे प्राचार्य नितीन जुनोनकर यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.व्ही. मुंजनकर यांनी आरोग्याच्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूरचे क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे बी.पी. रामटेके, आर.एम. सोनसळ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)