शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

शासन बदलले मात्र शेतमालाचे भाव तेच

By admin | Updated: December 29, 2014 01:08 IST

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. नव्या शासनाकडून शेतकऱ्यांना भाववाढीची भेट मिळेल, अशी आशा होती.

नांदाफाटा : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. नव्या शासनाकडून शेतकऱ्यांना भाववाढीची भेट मिळेल, अशी आशा होती. मात्र शेतमालाच्या किमती गेल्या वर्षीप्रमाणेच स्थिर असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. गेल्यावर्षी कापसाचा हमीभाव ४ हजार रुपये, सोयाबीन २ हजार ५६० रुपये, धान १ हजार ३०० ते १ हजारर ४५० रुपये याप्रमाणे होता. यावर्षी कापसाला ४ हजार ५०, सोयाबीन आणि धान मात्र जैसे थे आहे. केवळ कापसासाठी ५० रुपयांची भाववाढ करुन शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडला पाने पुसली आहे. विदर्भात कापूस, सोयाबीन आणि धानाचे मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून उत्पादन घेतले जाते. यातच गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि आता कोरडा दुष्काळ पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याचाच परिणाम विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. निवडणुकीपूर्वी विरोधी बाकावर बसून कापसाला ६ हजार रुपये, धानाला ३ हजार रुपये तर सोयाबीनला ५ हजार रुपये भाव मागणारे सध्याचे मुख्यमंत्री सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कसे विचारले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.कापसाचा उत्पादन खर्च साधारणत: ६ हजार ८०० ते ७ हजारांपर्यंत आहेत. यातच महागडे बियाणे आणि किटकनाशकांमुळे सोयाबीन आणि धानाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या या हमीभावात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरुन निघणे कठिण झाले आहे. यावर्षी कोरडा दुष्काळ असल्याने उत्पादनाची टक्केवारी कमालीची घसरली आहे. तर दुसरीकडे सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस साचलेला असून भाव नसल्याने नाराजी पसरली आहे. वाढत्या मजुरांचा खर्च आणि शेतीसाहित्याचा विचार केल्यास आता शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना उधारवाडी करुन कुटुंब चालवावे लागत आहे. काही ठिकाणी मुलींचे लग्न आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्चही पेलवणारा नाही. शासनाने परीक्षा शुल्क माफ केले असले तरी पोटाला लागणारे अन्न आणि मुलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या, हा प्रश्न आजही कायमच आहे. (वार्ताहर)