शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात लवकरच सोडणार - मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 01:06 IST

गोसेखुर्द धरणाचे पाणी लवकरच घोडाझरी तलावात सोडण्यात येईल, अशी ग्वाही शुक्रवारी राज्याचे वित्त तथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागभीड येथे दिली.

कार्यकर्त्यांशी संवाद : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पणचंद्रपूर : गोसेखुर्द धरणाचे पाणी लवकरच घोडाझरी तलावात सोडण्यात येईल, अशी ग्वाही शुक्रवारी राज्याचे वित्त तथा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागभीड येथे दिली. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी नागभीड तालुक्याचा दौरा करून तेथील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी नागभीड येथील भाजपा कार्यालयाला भेट दिली. यावेळी खा. अशोक नेते, माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर, आ. कीर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे, होमदेव मेश्राम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध उपलब्धी, लोककल्याणकारी निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. या भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गोसीखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात लवकरच सोडण्यात येईल व या भागातील शेतक-यांना दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते नागभीड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयाचे लोकार्पणदेखील झाले. पाण्याचे महत्व ओळखून वन क्षेत्रातील वाहते पाणी तलावात कसे सोडता येईल, यावर विचार करावा तसेच वनक्षेत्रात बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)