शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वंकष विकासासाठी सुशासन अत्यावश्यक

By admin | Updated: January 1, 2016 01:51 IST

देशाच्या संविधानाशी अभिप्रेत असलेली लोकशाही समृद्ध मानली गेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाचे

चंद्रपूर : देशाच्या संविधानाशी अभिप्रेत असलेली लोकशाही समृद्ध मानली गेली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाचे कार्य प्रभावीपणे चालल्यास किंबहूना शासन व प्रशासनाच्या कार्यास लोकाभिमुखतेची जोड दिल्यास खऱ्या अर्थाने सुशासनाची प्रतिष्ठापणा होऊ शकते व हे कार्य राष्ट्रस्तरीय ठरल्यास देशाच्या सर्वकष विकासाचा वेग अधिक गतिमान व प्रशस्त होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसापासून प्रारंभ झालेल्या राष्ट्रीय सुशासन दिन सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित नागरिकांशी संवाद या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.स्थानिय प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आ. नाना शामकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी मंत्री संजय देवतळे, आ. संजय धोटे, वणीचे आमदार संजीव रेड्डी, बोदरकुरवार, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, रमेश बागला, प्रमोद कडू, उपमहापौर वसंत देशमुख, महिला नेत्या वनिता कानडे, डॉ. एम. जे. खान, देवराव भोंगळे, हरिश शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, उपजिल्हाधिकारी संजय धिवरे, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, संजय दैने, अनिल फुलझेले, अंजली घोटेकर, नामदेव डाहूले आदींची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संयुक्त संचालन अंजली घोटेकर, नासिर खान यांनी केले.कार्यक्रमाला चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, मूल, वणी आदी तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, भाजपाचे व अन्य पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून या राष्ट्रीय सुशासन दिन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. (प्रतिनिधी)