शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

गोंडराजे समाज सुधारक ट्रस्टद्वारा धरणे

By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST

वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राणी हिराई वैद्यकीय महाविद्यालय’ हे नामकरण करण्यात यावे. या मागणीसाठी शनिवारी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राणी हिराई वैद्यकीय महाविद्यालय’ हे नामकरण करण्यात यावे. या मागणीसाठी शनिवारी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.चंद्रपूर शहराची निर्मिती राणी हिराई या गोंड महाराणीने केलेली आहे. तसेच महाराष्ट्राची पहिली महिला प्रशासक म्हणून त्यांचा नामोउल्लेख केला जातो. चंद्रपुरातील अनेक वास्तु त्यांची साक्ष देत आहे. महाकाली मंदिराची स्थापना राणी हिराई यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रातील भक्त देवी महाकालीच्या दर्शनासाठी येतात, असे अनेक अतुलनीय कार्य व समाज उपयोगी कार्य राणी हिराई यांनी केले आहे. रुग्णांची समस्या सोडविण्यासाठी वैद्यूची नेमणूक केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी राणी हिराई आदर्श आहे. वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थी डॉक्टर होऊन लोकांच्या सेवेसाठी बाहेर पडेल, तेव्हा राणी हिराई यांचे कार्य ते डोळ्यासमोर ठेवणार. चंद्रपूर शहरातील विरासत ही गोंड राजाची असूनसुद्धा कोणत्याही ठिकाणाला गोंडराजा घराण्यातील व्यक्तीच नाव नसणे ही एक शोकांतिका आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील आठ लाख आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर ठेवून वैद्यकीय महाविद्यालयाला राणी हिराई वैद्यकीय महाविद्यालय हे नामकरण करण्यात यावे. या मागणीसाठी गोंडराजे समाज सुधारक ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी चंद्रपुरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणे आंदोलनाला गोंडाराजे समाज सुधारक ट्रस्टचे अध्यक्ष गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम, कुमुद जुमनाके, संतोष मेश्राम (भुमक), रजनी परचाके, छाया तलांडे, डॉ.आनंद किन्नाके, शिला कुळमेथे, विना पेन्दाम, शोभा कन्नाके, आनंदाबाई आत्राम, तारा अडकाम, छाया मसराम व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)