शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

गोंडपिपरी पोलिसांच्या बोटचेपे धोरणामुळे तालुक्यात दारूबंदीचा फज्जा

By admin | Updated: July 7, 2015 01:10 IST

जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी होताच, अवैध विक्री व दारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी जिल्हाभरातील पोलिसांनी कंबर कसली.

गस्तीतील कारवायांमध्ये साटेलोटे : अर्थकारणातून होते मद्यपींची सुटकागोंडपिपरी : जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी होताच, अवैध विक्री व दारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी जिल्हाभरातील पोलिसांनी कंबर कसली. मात्र जिल्हा सीमेवर तसेच तेलंगणा राज्यालगत वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात दारूचा महापूर वाहत असून पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाया सामान्यांसाठी कायदेशीर तर असामान्यांना अर्थकारणातून सुटका देणाऱ्या असल्याने तालुक्यात दारूबंदीचा फज्जा उडाला आहे.जिल्हाभरात दारूविक्रीतून कोट्यवधीचा महसूल शासनाला मिळत असतानाही भाजपाचे सरकार येताच जिल्ह्यात दारूबंदी करून त्याची शिस्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र तालुक्याच्या सीमेला लागून तेलंगणा राज्य असल्याने छुप्या मार्गाने तालुक्यात दारू पोहचविण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. तालुक्यातील भंगाराम तळोधी परिसरात खुलेआम दारू विक्री केली जात असून तेथील चौकी प्रमुख सहाय्यक फौजदार आगबत्तनवार हे दारूविक्रीबाबत कमालिचे मौन बाळगत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस यंत्रणा ‘अर्थ’पूर्ण संबंधातून दारू विक्रेत्यांना अभय देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या सदर परिसरात शिक्षकांकडून विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण, दारू तस्करी, अवैध दारू विक्री, प्रवासी वाहतूक, भांडण-तंटे अशा अनेक गुन्ह्यांचा नोंदीपूर्वीच देवाणघेवाणातून निपटारा करून मलाई लाटण्याचे कार्य चौकी प्रमुखाकडून केल्या जात असल्याचे नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भंगाराम तळोधी परिसरातील नंदवर्धन, शिवणी, पानोरा नदीघाटावर दररोज यात्रेसारखी नागरिकांची गर्दी जमत असून पैलतिरावरून मद्यप्राशन करून येणाऱ्या नागरिकांची झडती घेवून पोलिसांकडून कारवाई करण्याऐवजी देवाण-घेवाणीतून सुटका केल्या जात असल्याचे कळते. गोंडपिपरी पोलिसांच्या अशा हप्तखोर धोरणामुळे पालकमंत्र्यांच्या अपेक्षांना तडा जात असून दारूबंदीचा फज्जा उडाला आहे. (तालुका प्रतिनिधी)