शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

चंद्रपुरात हे चाललंय काय? जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेसह दोन मुलांना जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 20:59 IST

Chandrapur News जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे आठ जणांना भानामतीच्या संशयावरून अमानुषपणे मारहाणीची घटना ताजी असताना चंद्रपूर जिल्ह्यातीलच नागभीड तालुक्यात मिंडाळा या गावात घटनेची पुनरावृत्ती झाली.

ठळक मुद्देजिवतीच्या प्रकरणाची चंद्रपूर जिल्ह्यातच पुनरावृत्ती पाच जणांना घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे आठ जणांना भानामतीच्या संशयावरून अमानुषपणे मारहाणीची घटना ताजी असताना चंद्रपूर जिल्ह्यातीलच नागभीड तालुक्यात मिंडाळा या गावात घटनेची पुनरावृत्ती झाली. जादूटोणाच्या संशयावरून वृद्ध महिलेसह तिच्या दोन मुलांना एका कुटुंबातील सदस्यांनी पाण्याच्या टाकीला दोराने बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची खळबळजनक घटना मिंडाळा बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. (Is this going on in Chandrapur? Two children, including an elderly woman, were beaten up on suspicion of witchcraft)मिंडाळा येथील इंदिरा उपासराव कामठे (७०) हिचा मुलगा अशोक कामठे हा जादूटोणा करतो. घरातून नेहमीच जादूटोण्याद्वारे पैसे गायब करतो, असा आरोपींचा संशय होता. या संशयातूनच मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अशोकच्या आई व बहिणीला मारहाण करण्यात आली.

यावेळी अशोक नागभीड येथे होता. आरोपींनी नागभीड गाठून अशोकला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून मिंडाळाला आणले. यानंतर त्याला गावातील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी अँगलला दोराने बांधून जबर मारहाण केली.

या अमानुष मारहाणीने कामठे कुटुंबीय प्रचंड घाबरले होते. मात्र, त्यांना नागभीडला येण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते, तसेच संध्याकाळ होत असल्याने त्या दिवशी तक्रार दाखल केली नाही. मात्र, बुधवारी सकाळीच अशोकच्या आईने नागभीड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. अशोक मारहाणीपासून घरी नसल्याचे समजते.या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके सर्व रा. मिंडाळा आणि मयुरीची आई, रा. कानपा या सर्वांना १४३, १४७, १४९, ४५२, ३२४, ३४२, ३६३, ३६८, ३२३ सहकलम ३ (१), (२) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी भेट दिली आहे. सध्या गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सामाजिक न्याय विभाग सुस्तचंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथील अमानुष घटनेची शाई वाळत नाही तोच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे अशाच प्रकारची घटना घडल्याने पुन्हा जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कायद्याबाबतची जनजागृती करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाला आहे. मात्र, हा विभाग याबाबत कुठेही जनजागृती करताना दिसत नाही. ही बाब या घटना घडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी