शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचा जीएमआर कंपनीला अल्टीमेटम

By admin | Updated: July 11, 2015 01:41 IST

वरोरा परिसरातील कंपनीमुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्या समस्या सोडविण्याकरिता जीएमआर एमको कंपनीला वारंवार पत्रव्यवहार केला.

वरोरा: वरोरा परिसरातील कंपनीमुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्या समस्या सोडविण्याकरिता जीएमआर एमको कंपनीला वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु कंपनीने दुर्लक्ष केले. त्यामुळे येत्या १९ जुलैपर्यंत कंपनीने समस्या निकाली काढल्या नाही तर कंपनीच्या विरोधात काम बंद आंदोलन उभारण्याचा इशारा आमदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे.औद्योगिक वसाहत मोहबाळा - वरोरा येथे वीज निर्मिती करणारा जीएमआर एमको प्रकल्प आहे. या प्रकल्पातील अधिकारी व कामगार वरोरा शहरात वास्तव्यास असल्याने शहराच्या नागरी सुविधाचा त्रास वरोरा नगरपालिकेला सहन करावा लागतो. कंपनीच्या पाणी भरलेल्या वाहनाच्या वर्दळीमुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे जीएमआर कंपनीने वरोरा नगरपालिकेला दरवर्षी मेटनन्स चार्ज म्हणून दोन कोटी रुपये द्यावे. कारखान्याच्या चिमणीतून निघणाऱ्या धुरीमुळे व कोळसा वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुरामुळे कंपनीच्या सभोवतालच्या २५ किमी परिसरातील शेतजमिनीची नापिकी झाल्याने शेतकऱ्यांना एकरी प्रति वर्ष ५० हजार रुपये अनुदान द्यावे. कंपनी परिसरातील २५ किमी अंतरावर असणाऱ्या गावातील दुधाळ जनावरांची प्रजनन क्षमता व दुध देण्याची क्षमता कमी झाल्याने कंपनीने प्रत्येक गावात पशुवैद्यकीय दवाखान्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता कंपनी परिसरातील २५ किमी अंतरावरील गावात बसेसची व्यवस्था करावी. ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात यावा. कंपनीत कार्यरत परप्रांतीय कामगारांचे व अधिकाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन द्यावे. कंपनीत दिवसा व रात्र पाळीत काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या मजूर कायद्यानुसार सोय सुविधा पुरविण्यात आल्या नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत असल्याने त्यांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. कंपनीने एमआयडीसीमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या व त्याचा वापर केला नाही. अशा जमिनी परत कराव्यात. कंपनीच्या २५ किमी परिसरातील प्रत्येक गावात दवाखाने उभारावे आदी मागण्या जीएमआरएमको कंपनीकडे वारंवार करण्यात आल्या. या मागण्या १९ जुलैपर्यंत मंजूर झाल्या नाही तर २० जुलैपासून कंपनीच्या विरोधात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून आमदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)