शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 00:35 IST

शिक्षण सर्वांना मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, याचा कायदाही करण्यात आला.

अनेकश्वर मेश्राम  बल्लारपूरशिक्षण सर्वांना मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, याचा कायदाही करण्यात आला. मात्र ज्या शाळेची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे, अशा सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जवळच्या शाळेत स्थलांतरित केले जाणार आहे. याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना बसणार असून त्या बंद होण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत. यामुळे शिक्षकही अतिरिक्त ठरणार आहेत.चारवट शाळेत केवळ सहा विद्यार्थीबल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत एकूण २८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. यातील विसापूर केंद्रातील चारवट येथील शाळेत पहिल्या वर्गात शून्य, दुसऱ्या वर्गात एक, तिसऱ्या वर्गात दोन तर चवथ्या वर्गात तीन असे एकूण सहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत दोन शिक्षक सहा विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. तालुक्यातील बामणी केंद्रातील असेगाव १५, कोर्टिमक्ता १८, कोर्टितुकूम १६, कोठारी केंद्रातील काटवली (बामणी) १९. काटवली २० व विसापूर केंद्रातील चारवट ६ व विद्युत केंद्र जिल्हा परिषद शाळेत १० विद्यार्थी आहेत. तालुक्यात सात शाळेत पटसंख्या कमी असल्याने आगामी शैक्षणिक सत्रापासून या शाळा कुलूपबंद होण्याच्या मार्गावर आहेत.राजुऱ्यात ४९ शाळेवर अवकळाराजुरा तालुक्यात एकूण जिल्हा परिषद शाळेपैकी तब्बल ४९ शाळेची पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील विरुर स्टेशन केंद्रातील १०, अहेरी केंद्रातील ७, देवाडा केंद्रातील ६, भेंडवी केंद्रातील ३, पांढरपवनी केंद्रातील ४, मानोली केंद्रातील ३, साखरी केंद्रातील ६, सास्ती केंद्रातील ३, नलफडी केंद्रातील २ तर राजुरा येथील तेलगू शाळा आणि टेंबुरवाही केंद्रातील ४ अशा एकूण ४९ प्राथमिक शाळेची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. परिणामी शिक्षण विभाग धास्तावला असून शाळेचे दार बंद झाल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेचा प्रश्न गंभीर वळण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्य शासनाचा शिक्षण विभाग ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून गाव तेथे शाळा उपक्रम राबवीत आहे. दुर्गम व आदिवासी भागात शिक्षण पोहोचविण्याचा भरपूर प्रयत्न करीत आहे. मात्र आजघडीला गाव खेड्यापर्यंत कायम विनाअनुदानीत तत्वावर इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सुरु केल्याने मराठी माध्यमाच्या शाळेवर अवकळा ओढवली आहे. परिणामी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस खालावत आहे. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढली म्हणून सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजना, शालेय गणवेश, मध्यान्ह भोजन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मुलींना उपस्थिती भत्ता आदी योजनावर करोडो रुपयाचा खर्च करीत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा १ हजार ५७२ इतक्या आहेत. यातील ४०० च्या आसपास शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० च्या आत आहे. यामुळे शासनाचा शालेय शिक्षण विभाग अशा शाळांना कुलूप लावण्याचा गंभीर विचार करीत आहे. तेथील शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वाहनाद्वारे जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेत आहे. शाळा बंद करण्याचा विपरित परिणाम कार्यरत शिक्षकांवर होणार असून शिक्षकही अतिरिक्त श्रेणीत येणार आहे. आगामी शैक्षणिक सत्रापासून शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने शिक्षकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून गाव तिथे शाळा शिक्षण विभागाचे सामाजिक न्यायचे धोरण आहे. त्यामुळे आदिवासी पाडे, दुर्गम ठिकाणच्या वस्त्या, तांडे आदी ठिकाणी प्राथमिक शाळा सुरु करण्यात आल्या. अशा ठिकाणची लोकसंख्या मुळातच कमी असल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्याही खालावली आहे. आदिवासी व कमकुवत घटकातील विद्यार्थी अशा शाळेत शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. परंतु ज्या शाळांची पटसंख्या २० च्या आत आहे, त्या शाळा बंद होतील. विद्यार्थी कमी असले तरी शिक्षण अशा गावापर्यंत पोहचत होते. मात्र त्याचा प्रवाह बंद होऊन गरजू विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.