शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:32 IST

कोरपना : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील, पैनगंगा व विदर्भ नदीच्या संगम स्थळावर असलेल्या संगमेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी ...

कोरपना : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील, पैनगंगा व विदर्भ नदीच्या संगम स्थळावर असलेल्या संगमेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. या संगम स्थळावरील मंदिर प्राचीन असून धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.

रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना त्रास

कोरपना : तालुक्यातील वनसडी ते कवठाळा फाटा मार्गाचे काम सुरू आहे. मात्र सदर काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील चिखलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक करतात. त्यामुळे रहदारीस अडचण जाते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.

रेल्वे मार्गाची नागरिकांची मागणी

मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

कोरपना-कातलाबोडी रस्त्याची दुरवस्था

कोरपना : तालुक्यातील कोरपना ते कातलाबोडी रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनधारक व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग कातलाबोडीसह बोरगाव, हातलोणी, तीर्थक्षेत्र घाटराई आदी गावांना पुढे जोडला गेला आहे. तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, उपकोषागार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शासकीय गोदाम, शासकीय आदिवासी मुलाचे वसतिगृह, वसंतराव नाईक महाविद्यालय येथे जाण्यासाठी याच प्रमुख मार्गाने जावे लागते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेलचेल असते; परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रवास करणे जिकिरीचे ठरते आहे.

उद्योगांची निर्मिती करावी

सिंदेवाही : तालुक्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्याताच आता बेरोजगारांमध्ये नैराश आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा पसरत आहे. तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे शेतीवर आधारित लघुउद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी आहे.

कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ

राजुरा : वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे. असे असतानाही काही तरुण मोठ्या प्रमाणात दुचाकीवर हॉर्न लावून वाजवितात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी आहे.