शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांच्या हाती जबाबदारी द्या

By admin | Updated: April 21, 2016 01:15 IST

पुतळ्याला हार घालून किंवा विहारमध्ये वंदना म्हणून हा लढा जिंकता येणार नाही, यासाठी तरुण पिढीला पुढे येऊ द्या,

बाळासाहेब आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवमूल : पुतळ्याला हार घालून किंवा विहारमध्ये वंदना म्हणून हा लढा जिंकता येणार नाही, यासाठी तरुण पिढीला पुढे येऊ द्या, आता त्यांच्यावर जबाबदारी द्या. त्यांच्याशी विचारातून चर्चा करा आणि येणारी पिढी समाज जागृतीसाठी कटिबद्ध राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करा. ‘जुनं ते सोनं’ पण सोनं हे पेटीत जमा करण्यासाठी असते, त्यामुळे आता जयंतीच्या निमित्ताने नवा संकल्प करून तरूण पिढीच्या हाती जबाबदारी द्या, असे प्रतिपादन भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने नवभारत विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी आयोजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवानिमित्य जनजागृती व मार्गदर्शन सभेत ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अशोक रामटेके होते. यावेळी भारीप बहुजन महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष राजु लोखंडे, युवा नेते अ‍ॅड. डॉ. संदीप नंदेश्वर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सेवचंद्र नागदेवते, भारीप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते पी.व्ही. मेश्राम, कोषाध्यक्ष बबन चहांदे, शहर सरचिटणीस विजय मेश्राम, शहर कोषाध्यक्ष अशोक कांबळे, विजया रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, शिष्यवृत्तीच्या बाबतीत शिक्षण चालक चिंतेत आहे. ओबीसीची शिष्यवृत्ती बंद करून शासन ओबीसीचं खच्चीकरण करीत आहे. यासाठी ओबीसींनी स्वत:हून स्वत:च्या मागण्या मागण्याचं शिकले पाहिजे तरच तो प्रगतीच्या मार्गावर राहू शकतो. आज आय.एस., इंजिनिअर, डॉक्टर बनायचं असेल तर लाखो रुपये मोजावे लागते, गरीब माणुस पैसे भरूच शकला नाही पाहिजे यासाठी हा सर्व उठाठेव असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. यावेळी अशोक रामटेके, राजु लोखंडे, अ‍ॅड. डॉ. संदिप नंदेश्वर, सेवचंद्र नागदेवते यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शहराध्यक्ष रमेश मानकर यांनी केले. संचालन स्वागत वनकर यांनी तर आभार विजय मेश्राम यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)