शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत ओबीसींना आरक्षण द्या

By admin | Updated: January 8, 2015 22:53 IST

चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नव्हती. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नव्हती. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित करण्यात याव्या, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक राजीव जैन यांना देण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष शशीकांत देशकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा सरचिटणीस निमेश मानकर, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, विधानसभा उपाध्यक्ष सुनील काळे, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष बब्बुभाई इसा, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेशसचिव अमित उमरे, शहर महासचिव महेंद्र लोखंडे, संजय तुरीले, संजय अडबाले तसेच पीडित ओबीसी तरुणांची उपस्थिती होती.मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील पोलीस भरतीत ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा जिल्हा प्रशासनातर्फे आरक्षित करण्यात आलेली नव्हती. परंतु इतर वर्धा, गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित करण्यात आलेल्या होत्या. मागील वर्षी या संदर्भात शशीकांत देशकर यांच्या नेतृत्त्वात चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री संजय देवतळे यांना निवेदन दिलेले होते. चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसीला घटनेनुसार १९ टक्के आरक्षण देण्यात आलेले होते. ते कालांतराने ११ टक्के करण्यात आले. परंतु मागील तीन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित केलेली नसल्यामुळे येथील बेरोजगार ओबीसी तरुणांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध असंतोष पसरलेला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)