शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

२२ दिवसानंतरही मुलींचा शोध नाही

By admin | Updated: December 25, 2014 23:30 IST

औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातून ३ डिसेंबर रोजी दोन मुली बेपत्ता झाल्या. २२ दिवसानंतरही या मुलींचा शोध घेण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहेत.

नांदाफाटा : औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातून ३ डिसेंबर रोजी दोन मुली बेपत्ता झाल्या. २२ दिवसानंतरही या मुलींचा शोध घेण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहेत.३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता गोवऱ्या वेचणीसाठी घराबाहेर पडलेल्या मुली सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली. त्यांनतर मुलीच्या आई- वडिलांनी दूरध्वनीवरुन नातेवाईकांना संपर्क केला. तसेच परिसरात शोध घेतला. मात्र दोन्ही मुलींचा पत्ता न लागल्याने शेवटी मुलींच्या आईवडिलांनी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर तात्काळ गडचांदूरचे ठाणेदार वंजारी यांनी पोलीस पथक सोबत घेऊन मुलींचा शोध घेणे सुरू केले. मात्र तब्बल २२ दिवस उलटूनही मुलींचा पत्ता न लागल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही मुली अल्पवयीन असून अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. यातील एक मुलगी गडचांदूर येथील झी- सेल या दुकानात काही महिने कामावर असल्याचेही समजते. घरी गॅस सिलिंडर नसल्याने गोवऱ्या गोळा करून आणाव्या लागतात. घटनेच्या दिवशी दोन्ही मुली गोवऱ्या गोळा करायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. गडचांदूरनजिक माणिकगड, अंबुजा हे दोन मोठे सिमेंट प्रकल्प आहे. त्यामुळे या परिसरात विविध राज्यातील नागरिकांचे जाणे- येणे असते. त्यामुळे मुलींचे कुणी पलायन तर केले नसेल ना, अशी शंका आहे.(वार्ताहर)