शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलावरून भेजगाव येथील ग्रामसभा ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:43 IST

मूल तालुक्यातील राजकीयदृष्टया अतिसंवेदनशिल समजल्या जाणाऱ्या भेजगाव येथील ग्रामसभा वादळी ठरली.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त : तब्बल चार तास सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील राजकीयदृष्टया अतिसंवेदनशिल समजल्या जाणाऱ्या भेजगाव येथील ग्रामसभा वादळी ठरली.प्रजासत्ताकदिनी कोरमअभावी तहकूब झालेली ग्रामसभा सोमवारी पार पडली. भेजगाव ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणुका सप्टेबर महिन्यात पार पडल्या. ग्रामपंचायतीत कॉग्रेसच्या सरपंचासह तीन सदस्य तर भाजपाचे उपसरपंचासह आठ सदस्य आहेत. भाजपाच्या आठही सदस्यांनी खुर्चीवर न बसता नागरिकांध्ये बसणे पसंत केले. १२ जानेवारीला पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला होता. या वर्षातील पहिलीच ग्रामसभा ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना गाव समस्येच्या अनेक प्रश्नांची भडीमार करुन भांबावून सोडले. ग्रामसभा तब्बल चार तास चालली.ग्रामसभेत खरे लाभार्थी घरकुलापासुन वंचित असून तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या राजकीय स्वार्थासाठी धनाढ्यांना घरकुलाचा लाभ मिळत असल्याची ओरड करण्यात आली. तर येसगाव येथे दारुविक्री सुरु आल्याने त्रस्त महिलांनी दारुबंदीसाठी विक्रेत्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याची मागणी केली. महिला आक्रमक झाल्याने दारुबंदीचा ठराव घेत अवैध दारु विक्रेत्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचा ठराव घेण्यात आला.भेजगावात पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा पार पडली. यावेळी सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांनी ग्रामसभेला मार्गदर्शन करीत शासकीेय योजनांची माहिती दिली. यावेळी उपसरपंच बबन लेनगुरे, ग्रामपंचायत सदस्य, पो.पा. एस.डी. गणवीर, अंगणवाडी सेविका वैशाली गांगरेड्डीवार, निमा शेंडे, कृपा चक्रनारायण उपस्थित होते.