शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मागणी करा, व्यायाम शाळा मिळवा !

By admin | Updated: December 27, 2014 22:47 IST

शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकांना व्यायामाची गरज आहे. मात्र स्पर्धेच्या युगामध्ये बहुतांश नागरिक व्यायामापासून दूर जात आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरशरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकांना व्यायामाची गरज आहे. मात्र स्पर्धेच्या युगामध्ये बहुतांश नागरिक व्यायामापासून दूर जात आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्याच्या समस्या सुटाव्यात, नवीन खेळाडू जिल्ह्यात निर्माण व्हावे, त्यांना क्रीडाक्षेत्राबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नवी योजना आखली आहे. ‘मागणी करा, व्यायाम शाळा मिळवा’ असा अनोखा प्रयोग आता राबविण्यात येत आहे.शहरी तसेच ग्रामीण परिसरामध्ये नागरिक व्यायामापासून दूर जात आहे. काही खेळाडूंंना आवड असतानाही त्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध नसते. अशावेळी त्यांना क्रीडाक्षेत्रापासून दूर रहावे लागते. मात्र आता ग्रामीण परिसरातील खेळाडूही क्रीडाक्षेत्रात मागे राहणार नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने व्यायाम शाळा बांधकामासाठी सात लाख रुपयांपर्यंतचा निधी देण्याची योजना आखली आहे. एकाच टप्प्यामध्ये निधी देऊन प्रत्येक गावांत व्यायाम शाळा उभ्या करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत किंवा संस्थांनी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. यापूर्वी ग्रामपातळीवर केवळ दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. आता मात्र यात वाढ करण्यात आली आहे. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मानसिकता असणे गरजेचे आहे. केवळ प्रस्ताव टाकून चालणार नाही तर गावातील नागरिक तथा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना क्रीडाक्षेत्रात आवड निर्माण करणे गरजेचे आहे. तेव्हाच योजनेचे फलित दिसून येईल.