शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

By admin | Updated: June 28, 2014 23:29 IST

स्पर्धेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा त्यांना गावातीलच शाळांमध्ये सुविधा मिळाव्या यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र काही शाळा संचालक शाळेत कोणताही सुविधा न पुरविता

केवळ देखावा : शाळेत वीज नाही, संगणक, वाचनालय, लॅबचा पत्ता नाही साईनाथ कुचनकार - चंद्रपूरस्पर्धेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा त्यांना गावातीलच शाळांमध्ये सुविधा मिळाव्या यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र काही शाळा संचालक शाळेत कोणताही सुविधा न पुरविता केवळ देखावा निर्माण करून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करीत आहे. विविध पळवाटा शोधून शासन तसेच अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करीत आहे. कोरपना तालुक्यातील आदर्श ग्राम विकास सेवा मंडळ पिपर्डाद्वारे संचालित कढोली येथील दगडोजीराव देशमुख विद्यालयात असाच प्रकार सुरु असून येथील विद्यार्थ्यांचे भविष्य आता अंधारात आहे.गडचांदूर येथून जवळच असलेल्या कढोली येथील या शाळेमध्ये अनेक असुविधा आहे. भारत २०२० मध्ये महासत्ता बनण्याचे स्वप्न बघत असताना या शाळेमध्ये अद्यापही साधा वीज पुरवठा नाही. त्यामुळे अन्य सुविधांचा प्रश्नच नाही. आरटी अ‍ॅक्टनुसार येथे सोयी विद्यार्थ्यांना पुरविल्या जात नसल्याचे शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या शाळेत वीज पुरवठा नाही. तसेच अन्य साधनांद्वारे कोणत्याही प्रकारे वीज उपलब्ध नसताना दहाव्या वर्गात आयटीसी हा संगणकासंबंधातील विषय विद्यार्थ्यांना कसा काय शिकविल्या जात असेल, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हा विषय आठवड्यातून दोन दिवस शिकविणे गरजेचे आहे. त्यातही प्रात्याक्षिकावर अधिक भर देणे महत्त्वाचे आहे. मात्र हा विषय मुळीच शिकविल्या जात नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. शाळा परिसरात प्रवेश करण्यासाठी साधा रस्ता नाही, टिनाचे शेड असलेल्या या शाळेमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नाही. संरक्षण भिंत नसल्यागत आहे. प्रयोगशाळा आहे मात्र त्यातील साहित्य गायब आहे. वाचनालय केवळ नापूरते आहे. यामध्ये केवळ अडगळीत साहित्य टाकून ठेवण्यात आले आहे. शौचालयाची स्थिती तर याहूनही बिकट आहे. येथे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थी उघड्यावर शौचास जात असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. पाण्याची सोय असली तरी ती विद्यार्थ्यांना त्रासदायक आहे. एक ना अनेक समस्या असलेल्या या शाळेमध्ये विद्यार्थी कसेबसे शिक्षण घेत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे उद्याचे भविष्य काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी केलेल्या शाळा तपासनीमध्ये उपशिक्षणाधिकारी टेंभुर्णे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक फटिंग, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक एस.एम. कोळवती आदी उपस्थित होते.