शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

नफेखोरीतून चालतो आरोग्याशी खेळ

By admin | Updated: April 25, 2016 00:41 IST

अधिक नफा मिळविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार पदार्थ व औषध विक्रेत्यांकडून सुरु आहे.

अन्न व औषध विभाग गप्प : ‘आॅल इज वेल’ म्हणत होते विक्रीचंद्रपूूर : अधिक नफा मिळविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार पदार्थ व औषध विक्रेत्यांकडून सुरु आहे. अनेकांकडे परवाना नसतानाही पदार्थांची विक्री सुरु आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करित असून केवळ नोटीस पाठविण्याचे काम सुरु आहे.अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार अन्न पदार्थ विक्रेत्यांपासून तर किरकोळ विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकांकडे नोंदणी प्रमाणपत्र किंवा अन्न परवाना असणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशनकडून अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उल्घंन होत आहे. नफेखोरीतून विक्रेते अनोंदणीकृत गोळ्या, औषधे व पदार्थांची सर्रास विक्री करित आहेत. ५ जानेवारी २०११ पासून अन्न सुुरक्षा व मानदे कायदा लागू करण्यात आला. पदार्थ उत्पादन करणाऱ्या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना बंधनकारक आहे. या कायद्या अंतर्गत पदार्थांची विक्री अन्न परवानाधारक संस्थामार्फत होणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांकडे नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही पदार्थांची विक्री केली जात आहे. त्यामुळे पदार्थांत भेसळीचे प्रकार घडत आहेत. अन्न सुरक्षा कायद्यानुसार औषध व पदार्थ विक्रीचे निकष ठरवून देण्यात आले आहे. हॉटेलमधील ग्राहकांसाठी व्यवस्था, पदार्थ तयार करण्याचे निकष आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अशी व्यवस्था दिसून येत नाही. अस्वच्छता अनेक हॉटेलात दिसून येते. चंद्रपूर शहरात जवळपास एक हजार तर प्रत्येक तालुक्यात सातशे ते आठशेच्या जवळपास किराणा दुकान आहेत. शहरातील किराणा दुकानांना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी भेट देऊन वर्षातून एकदा तरी पाहणी करतात. मात्र, ग्रामीण भागात हे अधिकारी कोणत्याही दुकानाला भेट देताना दिसत नाही. त्यामुळे या दुकानांवरुन अनोंदणीकृत चॉकलेट, गोळ्या विक्री केली जात आहे. लहान मुलांना फारसी समज नसल्याने खाऊ म्हणून या गोळ्या सेवन करतात. मात्र, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच पदार्थांच्या बाबतीतही हाच प्रकार घडत आहे. शहरातील पदार्थ विक्रीच्या दुकानाची तपासणी नियमित होत नाही. तर ग्रामीण भाग व मुख्य मार्गावर असलेल्या हॉटेल, धाब्यांची तपासणी होत नाही.झालीच तर आधीच पदार्थ उत्पादकांना माहिती मिळत असते. त्यामुळे अधिकारी पोहल्यावर सर्व ‘आॅल इज वेल’ आढळून येते. त्यामुळे अधिकाऱ्यांची कोणतीही भीती न बाळगता धाबे चालक अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उल्घंन करीत आहेत, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)गुटखा बंदी नावापुुरतीशासनाने मावाजन्य व गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, बंदीची अंमलबजावणी करणारे अधिकारीच कारवाई करण्यास निरुत्साही दिसून येत आहेत. शहरात खुलेआम मावाजन्य पदार्थाची विक्री होत आहे. हे नागरिकांना दिसत असले तरी अधिकाऱ्यांना दिसत नसावे तर नवलच. कारवाई करण्याचा अधिकार असूनही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी थेट जाऊन कारवाई करु शकत नाही. त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करता येऊ शकते. परंतु, तसे पाऊल उचलले जाणे गरजेचे आहे.