शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात गोवरी-सास्ती गावाला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:39 IST

शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नाल्याला पाणी आले. मात्र पुढे नाल्याचा प्रवाह वेकोलिने माती टाकून अडविल्याने गोवरी वसाहतीपासून - बाबापूर गावाकडे जाण्याºया रस्त्यावरील नाल्याला एकाच दिवसाच्या पाण्याने पुराचे स्वरूप आले होते.

ठळक मुद्देएका दिवसाच्या पावसाने नाला फुल्ल : मातीच्या ढिगाऱ्याने अडला पाण्याचा प्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नाल्याला पाणी आले. मात्र पुढे नाल्याचा प्रवाह वेकोलिने माती टाकून अडविल्याने गोवरी वसाहतीपासून - बाबापूर गावाकडे जाण्याºया रस्त्यावरील नाल्याला एकाच दिवसाच्या पाण्याने पुराचे स्वरूप आले होते. त्यामुळे पावसाळ्यात गोवरी- सास्ती गावाला पुराचा धोका असल्याचे दिसून येते. वेकोलिने तत्काळ उपाययोजना केली नाही तर वेकोलि परिसरातील गावांना यावर्षी पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.राजुरा तालुक्यातील कोळसा खाणीची मुजोरी वेकोलि परिसरातील गावांचे प्रचंड नुकसान करणारी आहे. गोवरी, सास्ती पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलि प्रशासनाने मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या काठावर टाकले आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास गोवरी परिसरात चांगलाच पाऊस बरसला. त्यामुळे गोवरी गावाजवळून वाहणाºया नाल्याला पाणी आले. मात्र वेकोलिने यावर्षी नाल्याच्या अगदी काठावर मातीचे ढिगारे टाकल्याने नाल्याचे नैसर्गिक पात्र पूर्णत: अरुंद झाले आहे.काही ठिकाणी नाल्याचा प्रवाहच अडल्याने नाल्यातून समोर पाणी निघण्याचे मार्गच बंद झाले. त्यामुळे रात्रीच्या सुमारास आलेल्या पावसाने पूर्ण नालाच पाण्याने हाऊसफूल्ल झाला. त्यामुळे पूरस्थितीसारखी परिस्थिती उदभवली होती. एका दिवसाच्या पावसाने नाल्याची ही परिस्थिती होत असेल तर पावसाळ्यात वेकोलि परिसरातील गावांचे काय होणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नाला पाण्याने भरला, यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र वेकोलिने जिवंत नैसर्गिक नाल्यावरच कुरघोडी केल्याने व मातीचे ढिगारे नाल्याच्या काठावर टाकल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली. यासाठी वेकोलिचे अधिकारी जबाबदार असून वेकोलिला नैसर्गिक नाल्याच्या पात्रात माती टाकून नाला वळविण्याचा अधिकार दिला कुणी, असा प्रश्न निसर्ग प्रेमी पर्यावरण संघटनेकडून विचारला जात आहे. भविष्यात पुराचा मोठा धोका टाळण्यासाठी वेकोलिने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. नाहीतर यावर्षी गोवरी- सास्ती गावासह परिसरातील गावांना पुराचा मोठा धोका होण्याची शक्यता आहे. यासाठी वकोलिच्या जबाबदार अधिकाºयांनी याकडे जाणीवपूर्णक लक्ष देणे गरजेचे आहे.