शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांचे भविष्य धोक्यात

By admin | Updated: September 14, 2016 00:51 IST

जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याअभावी कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली.

वरोरा कॉग्रेस कमिटी : आयुक्तांना निवेदनचंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याअभावी कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र या कंत्राटदारांकडून या कामगारांना शासकीय नियमानूसार वेतन देण्यात येत नाही. तसेच कंत्राटदाराने मागील दहा वर्षापासून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. परिणामी या कामगाराचे भविष्य अंधारात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक शेख जेरुद्दीन यांच्या नेतृत्वात वरोरा शहर कॉग्रेसच्यावतीने कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुक्यातील रुग्णालयात अपूरे कर्मचारी असल्याने सफाई, मेस व ईतर कामांकरिता कामगार सुरक्षारक्षक, वार्डबाय यांची भरती करण्यात आली. त्या कामगारांना निविदेत मंजूर व शासनाच्या भविष्य निर्वाह निधी व ईतर निधी कपात करुन त्यांच्या पुढील भविष्याकरिता प्रशासनाकडे जमा करणे गरजेचे होते. मात्र कंत्राटदाराने मागील १० वर्षापासून कामगारांचे भविष्य निर्वाह निधी भरलेला नाही. तसेच कामगारांना शासकीय नियमानुसार २८३ प्रती दिवस वेतन देणे गरजेचे होते. मात्र कामगारांना १०० रुपये प्रती दिवस आकारना करुन तीन हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. सन २००७ मध्ये एक हजार २०० रुपये, त्यानंतर दोन हजार रुपये, सन २०१५-१६ पासून तीन हजार रुपये प्रति महिना वेतन कामगारांना दिल्या जात आहे. परंतु भविष्य निर्वाह निधी व इतर दरमहा दीड हजार कपात करुन भरणा केल्या जात नाही. अशाप्रकारे कामगारांचे शोषण केल्या जात आहे. तसेच शासन नियमांचे उल्लंघन करुन कामगारांना कमी वेतन देण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची मागणी वरोरा शहर कॉग्रेस कमेटीच्यावतीने कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)कामगार किमानवेतनापासून वंचितचंद्रपूर जिल्ह्यात किमान वेतना अधिनियमाची अंमलबजावणी पूर्णपणे निरंक आहे. कामगार विभागाची कामगिरी अत्यंत दयनीय आहे. कंत्राटी कामगारांकडून मोठ्या प्रमाणात काम करवून घेतले जाते. परंतु त्या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भ प्रहार संघटनेतर्फे सुमारे ६० ते ७० कोटींचे दावे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे किमान वेतन कायद्याची अमलबंजावणी योग्य प्रमाणात करण्याची मागणी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. हर्षलकुमार चिपळूनकर यांनी केली आहे.