शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मूल शहर विकासाला निधी कमी पडू देणार नाही

By admin | Updated: January 9, 2016 01:24 IST

मूल शहर विकास परिषदेत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता येत्या काही दिवसात होणार असून त्यांचे नियोजन विविध ...

सुधीर मुनगंटीवार : नगर पालिका पदाधिकाऱ्यांत नियोजन नसल्याने नाराजीमूल : मूल शहर विकास परिषदेत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता येत्या काही दिवसात होणार असून त्यांचे नियोजन विविध विभागांना दिले आहे. विकासाबरोबरच बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न ‘टाटा ट्रस्ट’च्या माध्यमातून केला जाणार आहे. मूल शहराच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र पालिका पदाधिकाऱ्यात मूल शहर विकासाचे नियोजन नसल्याचा ठपका ठेवत नाराजीचा सूर राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील तसेच मूल शहरात होत असलेल्या सिमेंट रस्त्याला करोडो रुपयाचा निधी दिला आहे. मूल शहरातील सर्वच रस्ते सिमेंट क्राँक्रीटने बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. बायपास वळण रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून शहरातील वाहनाची कोंडी कमी होण्यास मदत होईल. चंद्रपूर-गडचिरोली महामार्ग राष्ट्रीय महामार्ग झाल्याने मूल शहराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरातील तलावात सौंदर्यीकरण केले जाणार असून मासेमारी व शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही. याबाबत सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर येथे असलेल्या प्रियदर्शनी सभागृहाप्रमाणे मूल शहरात स्व.मा.सा. कन्नमवार या नावाने सभागृह अस्तित्वात येणार असून यात सर्व सुविधांचा समावेश असेल. गरीब व होतकरु स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी श्याम मुखर्जी वाचनालय अस्तित्वात येणार आहे. बसस्थानकाचे नुतनीकरण केले जाणार असून अद्यावत स्वरुपाचे बसस्थानक बनणार आहे. तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत तसेच पंचायत समितीची इमारत देखील नव्या स्वरुपात दिसणार आहे. मूल शहरात ९.९७ कोटी रुपयाची विद्युत व्यवस्था साकारली जाणार असून त्यात सौंदर्यीकरण वाढणार आहे. वनविभागाच्या ६० एकर जागेत वृक्षारोपण व बगीचाची निर्मिती केली जाणार आहे. शहर विकासाबरोबरच बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’च्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न निकाली काढला जाणार आहे. यासंदर्भात अंतिम टप्प्यात काम आले असल्याचे त्यांनी सांगितले. मूल शहराच्या विकासाला चालना देऊन विविध विकास कामे गेल्या अनेक वर्षात झाले नसतील ती कामे केली जाणार आहे. यासाठी न.प. पदाधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे स्व. मा.सा. कन्नमवार सभागृह पुर्णत्वास आल्यावर त्याची देखभाल करण्याची जबाबदारी तहसील कार्यालयावर देण्यात येईल असेही ते म्हणाले. नागरिकांनी विविध विकासात्मक बाबीसाठी नाविण्यपूर्ण सुचविल्यास विकासात्मक कार्यात भर घालता येईल, असेही ना. मुनगंटीवार यांनी मत व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)