शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या दुुरुस्तीसाठी ३० लाखांचा निधी

By admin | Updated: September 3, 2014 23:15 IST

दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होत असल्याची ओरड आहे. ही ओरड कायम बंद व्हावी, जिल्हा परिषद शाळांना पूर्वीसारखे दिवस यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासन

शिक्षण समितीची सभा : २४ शाळांना मिळणार संगणकचंद्रपूर : दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होत असल्याची ओरड आहे. ही ओरड कायम बंद व्हावी, जिल्हा परिषद शाळांना पूर्वीसारखे दिवस यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासन गुणवत्तावाढीसोबतच, प्रशस्त इमारत, दर्जेदार बैठक व्यवस्था करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. यासाठी शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. जिल्ह्यातील ३४ शाळांच्या दुरुस्तीसाठी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.जिल्हा परिषद शिक्षण विभागाची सभा बुधवारी जिल्हा परिषद सभागृहात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव रामभाऊ टोंगे, ब्रिजभूषण पाझारे, चौखे आदी सदस्य उपस्थित होते. शिक्षण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार अनुपस्थितीत होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शाळा येरूर येथील अतिरिक्त शिक्षकाचा मुद्दा यावेळी गाजला. नकोडा येथील शिक्षकाची बदली करून येरूर येथे शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षक दिला. त्यामुळे दुसऱ्या शिक्षकावर अतिरिक्त होण्याची वेळ आली. अशा अनेक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक देण्यात आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ब्रिजभूषण पाझारे यांनी लावून धरली. याप्रकरणी योग्य चौकशी करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या ३४ शाळांची दुरुस्तीसाठी मंजूरी देण्यात आली असून यासाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. सोबतच २४ शाळांनी ५४ संगणक पुरविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून १० शाळांना निर्लेखित करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षक दिनाचा कार्यक्रमासाठी एक लाख रुपयाचा निधीच्या खर्चाचा शिक्षण समितीने मंजूरी दिली.(नगर प्रतिनिधी)