शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजनांसाठी जिल्हा परिषदेला २३ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन या दोन योजनांमुळे आत्मसन्मानाने जगण्याचे मार्ग सापडतात. मात्र, कोरोनामुळे सरकारने ३३ टक्केच निधी दिला ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन या दोन योजनांमुळे आत्मसन्मानाने जगण्याचे मार्ग सापडतात. मात्र, कोरोनामुळे सरकारने ३३ टक्केच निधी दिला होता. या धोरणात बदल केल्याने जिल्हा परिषदला सुमारे २३ कोटींचा निधी नुकताच प्राप्त झाला. या योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती-नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविली जाते. शासनाच्या या अनुदान

योजनेतंर्गत नवीन विहिरीसाठी २. ५० लाख, जुनी विहीर दुरूस्ती ५० हजार, इनवेल बोअरींग २० हजार, पंप संच २० हजार, वीज जोडणीसाठी १० हजार, शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण एक लाख व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच ५० हजार किंवा तुषार सिंचन संच २५ हजार), पीव्हीसी पाईप ३० हजार, परसबाग ५०० अनुदान दिल्या जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती (क्षेत्रातंर्गत व क्षेत्राबाहेरील) योजनेसाठी अनुसूचित जमातीचे शेतकरी पात्र ठरतात. त्याकरिता लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या मर्यादेत असावी. लाभार्थ्यांची जमिनधारणा ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर) असणे बंधनकारक आहे. या दोन्ही योजनांसाठी राज्य शासनाने यापूर्वी केवळ ३३ टक्के निधी दिला होता. त्यामुळे अनुुदान योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया रखडली होती. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी जुन्या निर्णयात बदल करून १०० टक्के निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. शिवाय, तातडीने निधी मंजूर केला. नवीन आदेशानुसार, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी क्षेत्र अंतर्गत ५ कोटी ५० हजार, क्षेत्राबाहेर २ कोटी ९६ लाख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी १५ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला आहे.

१० हजारपेक्षा जास्त अर्जदार

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी सुमारे १० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज सादर केल्याचा अंदाज आहे. उपलब्ध निधीनुसार शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू आहे.