शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिलेसह दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे

By admin | Updated: June 15, 2014 23:26 IST

पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरताना तालुक्यातील गोजोली येथील वासुदेव पोचू डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांनी बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले.

गोंडपिपरी : पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरताना तालुक्यातील गोजोली येथील वासुदेव पोचू डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांनी बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले. ही बाब लक्षात येताच, येथील तहसीलदारांनी समाजकल्याण अधिकाऱ्याशी संपर्क करुन त्याची खातरजमा केली. त्यानंतर यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, अटक केलेल्या वासुदेव डोंगरे याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून याच प्रकरणातील लक्ष्मी मोहुर्ले हिला अद्यापही अटक करण्यात आली नाही. तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक २२ जून रोजी निवडणूक घेण्यात येत आहे. यात राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्याकरिता जात प्रमाणपत्राची अट आहे. तालुक्यातील गोजोली येथील वासुदेव पोचु डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांनी बनावट जात प्रमाणपत्र तयार करुन उमेदवारी अर्ज तहसीलदार विराणी यांचेकडे सादर केला. मात्र विराणी यांना वासुदेव डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र बोगस असल्याची माहिती अगोदर मिळाली होती. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेले प्रमाणपत्र खरे की खोटे, हे जाणून घेण्यासाठी थेट समाजकल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. प्रमाणपत्र खोटे असल्याबाबतची खात्री पटताच तहसीलदार विराणी यांनी गोंडपिपरी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीवरुन वासुदेव डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांच्याविरुद्ध भादंवि ४६८, ४७१, ४२०, ३४ कलम अन्वये गुन्ह्याची नोंद करुन काल रात्री वासुदेव डोंगरे याला अटक केली. (तालुका प्रतिनिधी)