शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहनाने तीन वर्षीय बालकाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST

चिमूर : शहरातील मासळ मार्गावरील वाल्मीक चौक येथे रस्त्यावर खेळत असलेल्या तीन वर्षीय बालकाला मासळकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने चिरडले. ...

चिमूर : शहरातील मासळ मार्गावरील वाल्मीक चौक येथे रस्त्यावर खेळत असलेल्या तीन वर्षीय बालकाला मासळकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने चिरडले. तत्काळ बालकाला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजतादरम्यान घडली.

धीरज शंकर भानारकर (३) रा. गुरुदेव वाॅर्ड, वाल्मीक चौक, चिमूर असे मृत बालकाचे नाव आहे. चिमूर- मासळ रोडवरील शहरालगत असलेल्या वाल्मीक चौकात रस्त्याच्या कडेला धीरज खेळत होता. चावडी चौक येथून येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एमएच ३४ एम ९३५५) धडक दिली. यात धीरज भानारकर गंभीर जखमी झाला. गाडी चालक व मालकाने त्या बालकाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मुंबई मोटर व्हेईकल ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून गाडी चालक सतीश इंदूरकर याला अटक केली आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.