शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यातच तलावाच्या नहराला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:17 IST

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील मामा तलावाच्या कामाला चार महिने होत नाही, तोच तलावाचे पाणी सोडल्याने नहराला भगदाड पडले असून काम निकृष्ट झाल्याचा नमुनाच प्रत्यक्षात दिसत आहे. कामे निकृष्ट झाल्याची ओरड यापूर्वी शेतकऱ्यांनी केली.

ठळक मुद्देनिकृष्ट कामाचा नमुना : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील मामा तलावाच्या कामाला चार महिने होत नाही, तोच तलावाचे पाणी सोडल्याने नहराला भगदाड पडले असून काम निकृष्ट झाल्याचा नमुनाच प्रत्यक्षात दिसत आहे. कामे निकृष्ट झाल्याची ओरड यापूर्वी शेतकऱ्यांनी केली. परंतु चंद्रपूर पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत आला. याचा परिणाम चार महिन्यातच नहराला भगदाड पडले आहे. त्यामुळे ऐन पाणी टंचाईत हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे.वासेरा मामा तलावाचे बांधकाम गेल्या पाच महिन्यापासून सुरू आहे. त्यात नहराचे बांधकाम, मातीकाम, आऊटलेट (मोरी बांधकाम), तलावाची पाळ, वेस्टवेअरचे काम इत्यादी कामे केली जात आहेत. यात आतापर्यंत ७० लाखांचा खर्च करण्यात आला आहे.सदर मामा तलावाचे काम एका कंत्राटदारामार्फत सुरू आहे. चार महिन्यातच नहराचे काम, आऊटलेटचे काम, पाळीचे काम पूर्णत्वास आले आहे. सुरूंदाचे काम करण्याकरिता तलावातील पाणी नहराने सोडण्यात आले. नहराचे पाणी सोडताच मापनरला सुनील बोरकर यांच्या शेताजवळ मोठे भगदाड पडले आहे. यामुळे नहरातील पाणी शेतात वाहत आहे. सदर नहराचे काम चार महिन्यांपूर्वी करण्यात आले. परंतु मातीकाम बरोबर न केल्याने सदर नहराला मोठा भगदाड पडला. निकृष्ट कामाचेच हे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे आता बोलले जात आहे. पावसाळ्यात तर पाणी नहराने वाहत असते. पावसाळ्यात पूर्ण नहरच वाहून जाणार का, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. विशेष म्हणजे, नहराचे बांधकाम निकृष्ट होत असल्याची काम सुरू असताना नागरिकांनी केली. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्याचा परिपाक असा झाला की चार महिन्यातच नहर फुटला.यापूर्वी ‘लोकमत’ने दोनदा वृत्त प्रकाशित करून कामाच्या निकृष्टतेकडे लक्ष वेधले होते. परंतु संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत होते. वासेरा येथील मामा तलावाच्या बांधकामाबद्दल सदर पाणीपुरवठा समिती वासेराने पाटबंधारे विभागाकडे तक्रार दाखल केली होती परंतु तक्रारीची साधी दखल विभागाने घेतली नाही.सदर कामाची चौकशी वरिष्ठ अधिकाºयांनी करावी. त्यातच आऊटलेट संबंधात चुकीचे बांधकाम झाले आहे. त्याचीही चौकशी करावी. नहराचे जे काम शिल्लक आहे, तेही तातडीने करावे, अशी मागणी आहे.