सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील किन्ही नाल्यात कारसह चार वाहून गेले. त्यात करण कावळे, पूजा राजूरकर, सुवर्णा राजूरकर हे शिक्षक व माहेश्वरी स्कूलचे अध्यक्ष सचिव गोविंदवार यांचा मृत्यू झाला. अर्थ व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कोठारी येथे मृतकांच्या घरी जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची सात्वंना केली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर यांनी दिला. मृतक उच्च शिक्षित होते. ते सर्वजण आपापल्या कुटुंबांचा आधार होते. कुटुंबाचे आधारवड, कमावत्या व्यक्ती निसर्गाच्या प्रकोपात हरपल्याने मोठा आघात झाला. अशात शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर करून आपत्तीग्रस्त कुटुंबांना आधार दिला. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा, राजू बुध्दलवार, मोरेश्वर लोहे, स्वप्नील फरकडे, शोभा वडघणे, स्नेहल टिवडिया, सुरेश राजूरकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांचा धनादेश
By admin | Updated: July 18, 2016 01:49 IST