शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केला शाळा नुतनीकरणाचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:22 IST

फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्युबिली हायस्कूलच्या काही माजी विद्यार्थ्यांनी स्वछता मोहीम हाती घेऊन शाळेच्या दुरवस्थेवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, मनपा सभापती राहुल पावडे यांनीसुद्धा पुढाकार घेतला.

ठळक मुद्देज्युबिली हायस्कूल : जि.प. कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठक

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्युबिली हायस्कूलच्या काही माजी विद्यार्थ्यांनी स्वछता मोहीम हाती घेऊन शाळेच्या दुरवस्थेवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, मनपा सभापती राहुल पावडे यांनीसुद्धा पुढाकार घेतला. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाळेच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले होते. याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नरेंद्र बुरांडे यांच्या कक्षात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. शाळेचे माजी विद्यार्थी जयंत मामीडवार यांनी समन्वय करून ही बैठक घडवून आणली.यावेळी अभियंता बुरांडे यांनी शाळेच्या नुतनीकरणाचा नियोजन आराखडा सर्व माजी विद्यार्थ्यांच्या अवलोकनार्थ सादर केला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आराखड्यामध्ये काही दुरुस्ती व जोड सुचवली. शाळेच्या सभोवताल असलेली सुरक्षा भिंतीची डागडूजी करून उंची वाढवणे, शाळेच्या उजव्या परिसरात खेळाचे पटांगण, व्यायामशाळा तसेच सुशोभीकरण इत्यादी बाबीमध्ये सुधारणा सुचवण्यात आली. शाळेच्या नुतनीकरणाच्या प्रस्तावाचे अंदाजपत्रक साधारण ७ कोटी रुपयांचे तयार करण्यात आले. यामध्ये मुख्य इमारतीच्या नुतनीकरणासाठी साडे पाच कोटी रुपये, वसतिगृह नुतनीकरणासाठी एक कोटी रुपये तसेच संपूर्ण सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांची तरतुद असल्याचे बुरांडे यांनी सांगितले.ज्युबिली हायस्कूलच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव नागपूर येथील रचनाकाराने तयार केला आहे. यामध्ये शाळेच्या संपूर्ण इमारतीची मूळ संरचना कायम ठेवून वर्गखोल्या व प्रयोगशाळा यांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.शाळेच्या मूळ ऐतिहासिक वास्तुचे जतन व्हावे, ही सर्व माजी विद्यार्थ्यांची इच्छा लक्षात घेऊनच आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या सूक्ष्म नियोजनासाठी पुढील महिन्यात आणखी एक बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये माजी विद्यार्थी व शाळेचे मुख्यध्यापक यांचे मत विचारात घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बुरांडे यांनी दिली.इमारतीच्या नूतनीकरणासोबतच शाळेतील इतर सोयी तसेच शैक्षणिक दर्जा पुनर्स्थापणासाठी माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापकांसोबत चर्चा करुन उपाययोजना सुचविल्या.