शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्यास मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

By admin | Updated: January 8, 2016 01:53 IST

विरुर वनपरिक्षेत्रातील सुब्बई बिटाचे वनरक्षक सिद्धार्थ रेसमा कांबळे हे नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १३२ मधून जंगल गस्त करुन रोजदारी मजुरासह परत येत असताना ...

कठोर कारवाई करा : वनरक्षक संघटनेची मागणीराजुरा : विरुर वनपरिक्षेत्रातील सुब्बई बिटाचे वनरक्षक सिद्धार्थ रेसमा कांबळे हे नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १३२ मधून जंगल गस्त करुन रोजदारी मजुरासह परत येत असताना सायंकाळी थोमापूर गावात पोहोचताच तेथील प्रकाश श्रीराम भुक्या यांनी अडवून मारहाण केली. याबाबतची तक्रार विरुर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून तक्रारीवरून पोलिसांनी भुक्या याच्यावर अदखपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ही घटना मंगळवारी घडली.महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना नागपूरने घटनेचा निषेध नोंदविला असून केंद्रीय संघटक राजेश पिंपळकर यांनी शासकीय कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. वनरक्षक कांबळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन विरुर येथे आरोपी प्रकाश श्रीराम भुक्या यावर भादंवि ३२४, ५०४, ५०६ व ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वीही कार्यरत वनरक्षक अहेमद मस्तान यांना मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.विरुर वनपरिक्षेत्रातील सुब्बई बिट अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त व अतिदुर्गम परिसरात आहे. या परिसरात आंध्रप्रदेशातील सागवान तस्करांकडून अवैध तोडीचा प्रकार घडत आहेत. त्यामुळे या परिसरातील वन कर्मचारी दहशतीत वनाचे रक्षण करीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या इसमावर भादंवी ३५३ व ३३३ नोंद करुन मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी वनरक्षक वनपाल संघटनेचे राजेश पिंपळकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावर कोणती कारवाई करतात याकडे संघटनेचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)