शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

विदेशी पर्यटकांना काढावी लागते हागणदारीतून वाट

By admin | Updated: December 2, 2015 00:47 IST

जगात वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारीव्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी चिमूर तालुक्यातील ...

मुख्य रस्ता घाणीने बरबटलेला : ताडोबाच्या प्रवेशद्वाराचे वास्तवराजकुमार चुनारकर खडसंगीजगात वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारीव्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी चिमूर तालुक्यातील कोलारा गावातून देश- विदेशातील पर्यटक येतात. देशात भारत स्वच्छ अभियान सुरू असताना चिमूर तालुक्यातील कोलारा गावाला मात्र स्वच्छतेचा विसर पडल्याचा प्रत्यय ताडोबाच्या भ्रमंतीसाठी येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटक तथा अतिविशिष्ट पर्यटकांना येत आहे. या मार्गाने ताबोडात प्रवेश करणाऱ्या विदेशी पर्यटकांना अक्षरश: हागणादारीतून वाट काढावी लागत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहचली आहे. या व्याघ्र प्रकल्पात हमखास वाघाचे दर्शन होते. त्यामुळे या प्रकल्पाला भेट देण्यासाठी महिन्याकाठी हजारो पर्यटक येतात. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, करांडला तथा वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पामुळे शासनाने नागपूरला टायगर कॅपीटल घोषित केले आहे.देश-विदेशातील पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी नागपूर शहरातून चंद्रपूर जिल्ह्यातूनच प्रवेश करावा लागतो. या प्रकल्पात जाण्यासाठी मोहर्ली गेट, नवेगाव गेट, कोलारा गेट व खुटवडा गेटवरुन जाता येते. यांपैकी मोहर्ली व कोलारा गेटवर पर्यटकांची अधिक पसंती आहे. त्यामुळे कोलारागेटवर देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात.चिमूर तालुक्यातील कोलारा गावात नऊ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. या गावाची लोकसंख्या साधारण दोन ते तीन हजारांच्या आत आहे. गावाच्या सभोवताल ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कोअर झोनचे जंगल लागले आहे., तर गाव मात्र पूर्ण वनविभागाच्या बफर झोनमध्ये वसले आहे. या गावात शिक्षणासाठी जिल्हा परिषदेची इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी चिमूरला जावे लागते. गावामध्ये मासळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र तथा फिरत पथक आहे. मात्र हे उपकेंद्र व फिरते पथक अनेक दिवसापासून आजारी पडले आहे. मात्र या समस्येसह गावात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे या जंगलव्याप्त गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.शासनाच्या हागणदारी मुक्त योजनेअंतर्गत या गावात काही प्रमाणात शौचालय तयार करण्यात आलेत. तसेच इंदिरा आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार ८५ टक्के शौचालय आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर अत्यल्प प्रमाणात असल्याचे वास्तव आहे. गावातील अनेक महिला व नागरिक शौचाससाठी उघड्यावरच जातात. त्यामुळे गावाच्या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूने हागणदारी निर्माण झाली आहे. तसेच गावात शेती व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांच्या खताचे खड्डे रस्त्याच्या दोन्ही बाजूने असल्याने खतामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे.स्वच्छ भारत मिशनचा स्थानिक ग्रामपंचायत तथा तालुका प्रशासनाला विसर पडल्याने कोलारा तोडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या देश- विदेशातील पर्यटकांना कोलारा गावातील वास्तव नजरेसमोर येत मोठ्या प्रमाणात हागणदारीचा सामना करावा लागत आहे. यातून पर्यटकांमध्ये काय संदेश जात असेल, याचा विचार करून स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.