शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कर सुसूत्रता व व्यापार सुलभतेसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

चंद्रपूर : ‘चांदा ते बांदा’ सर्वत्र व्यापार- उद्योगांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. यासाठी कर प्रणालीत सुसूत्रता व व्यापार सुलभतेसाठी ...

चंद्रपूर : ‘चांदा ते बांदा’ सर्वत्र व्यापार- उद्योगांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. यासाठी

कर प्रणालीत सुसूत्रता व व्यापार सुलभतेसाठी महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज

सरकारकडे पाठपुरावा करणार, अशी ग्वाही ललित गांधी यांनी दिली.

चंद्रपूर चेम्बर ऑफ कॉमर्स, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त आयोजनातील व्यापारी उद्योजक सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

यावेळी चंद्रपूर चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी.ए. हर्षवर्धन संघवी, चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रामजीवन परमार आदी उपस्थित होते. हर्षवर्धन संघवी यांनी जीएसटी करप्रणालीतील त्रुटींचे विस्ताराने विश्‍लेषण करून या त्रुटी तात्काळ दूर होण्याची गरज विशद केली. मधुसूदन रुंगठा यांनी उद्योगांना करप्रणालीतील अडचणींबरोबर, कच्च्या मालाचे वाढलेले दर, इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च, तसेच दुहेरी कराची आकारणी यामुळे उद्योग चालविणे कठीण असल्याचे सांगितले. रामजीवन परमार यांनी फूड सेफ्टी अ‍ॅक्टमधील अन्यायकारक तरतुदी दुरुस्त व्हाव्यात, अशी मागणी केली. याप्रसंगी विविध संस्था व मान्यवरांनी ललित गांधी यांचा सत्कार केला. खुल्या सत्रात विचारलेल्या प्रश्‍नांना ललित गांधी यांनी उत्तरे दिली. न्याय्य मागण्या व विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी व्यापारी उद्योजकांनी राज्याची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन गांधी यांनी केले.