शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रावर गर्दी न करता शिस्तीचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान राबविले जात ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान राबविले जात आहे. शहरातील नागरिकांना लस देण्यासाठी चंद्रपूर शहर महापालिका कार्य करीत आहे. नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून शहरातील विविध भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार लस दिली जात आहे.

लस प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला दिली जाणार आहे. मात्र, काही केंद्रावर वारंवार सूचना देऊनही काही नागरिक शिस्तीचे पालन करताना दिसत नाहीत. तसेच काही नागरिक विनाकारण आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. तेथील सुरक्षारक्षकाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. गर्दी करून आपणच कोरोनाला निमंत्रण देत आहोत, हे लक्षात ठेवून नागरिकांनी जबाबदारीने सुरक्षित अंतर राखून रांगेत उभे राहावे, असेही आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.