शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पाच हजार मेट्रिक टन धान्य राहणार सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:05 IST

शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गोदामाची गरज भासते.

ठळक मुद्देपाच बाजार समित्यांमध्ये नवी गोदामे : शेतमाल तारणमाल योजनेला गती

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गोदामाची गरज भासते. मात्र, आर्थिक मर्यादेमुळे गोदाम बांधणे शक्य नाही. अशातच राष्ट्रीय विकास कृषी योजनेतंर्गत अनुदान देण्याचे शासनाने मान्य केल्याने पाच बाजार समित्यांना गोदाम बांधण्याची समस्या दूर झाली. बांधकाम पूर्ण झाल्यास ५ हजार मेट्रिक टन धान्य सुरक्षित ठेवता येणार आहे.कृषी मालाला योग्य भाव मिळावा आणि व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, यासाठी माफक दरात शेतमाल साठवून ठेवण्याची तारण योजना काही वर्षांपासून सुरू केली. पण, जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांना स्वत:च्या उत्पन्नातून गोदाम बांधणे आवाक्यापलीकडचे होते. शासनाच्या विविध योजनांमधून भांडवल मिळविण्याच्या दृष्टीने समित्यांनी प्रयत्न सुरू ठेऊनही निधीअभावी शक्य झाले नाही. त्यामुळे समित्यांमध्ये जादा क्षमतेची गोदामे उभी राहू शकली नाही. काही बाजार समित्यांमध्ये गोदामेच नसल्याने शेतकºयांचा शेतमाल तारण ठेवण्यास अडचणी निर्माण होत आहे. राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत बाजार समितीमध्ये गोदाम उभारण्यासाठी २५ टक्के अनुदानावर निधी देण्यास शासनाने मंजुरी दिली. यातून पाच बाजार समित्यांमध्ये गोदामे उभी राहतील.चंद्रपुरात १२०० मेट्रिक टन क्षमतेचे गोदामचंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली. त्या तुलनेत सोईसुविधायुक्त गोदामाची कमतरता आहे. बाजार समितीच्या व्यवस्थापनाने राज्य शासनानेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे १२०० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी आर्थिक मदत मिळविण्यास यश आले आहे. येत्या काही महिन्यानंतर कामाला सुरूवात होणार आहे.आठ बाजार समित्यांना गोदामांची प्रतीक्षापाच बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेतंर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी मिळविण्यास यशस्वी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना तारण योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल, वरोरा, भद्रावती, नागभिड आदी पाच बाजार समित्या या योजनेचा लाभ घेण्यास पुढे सरसावल्या. मात्र, आर्थिक क्षमतेसाठी उर्वरित बाजार समित्यांवर गोदामांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.ब्रह्मपुरीत प्रस्तावाची तयारीधानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेणाऱ्या ब्रह्मपुरी येथे बाजार समितीमध्ये गोदामाची अत्यंत आवश्यकता आहे. आर्थिक मर्यादेमुळे बांधकाम करता आले नाही. मात्र, सद्य:स्थितीत गाळ्यांचे बांधकाम सुरू असून एप्रिल २०१८ मध्ये एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.