शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच आरोग्य केंद्रात पाच वैद्यकीय अधिकारी

By admin | Updated: April 23, 2016 00:50 IST

दोन महिन्यांपूर्वी पोंभुर्णा तालुक्यात तापाची साथ पसरली होती. त्यामुळे आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली.

पोंभुर्णा आरोग्य केंद्रचंद्रपूर : दोन महिन्यांपूर्वी पोंभुर्णा तालुक्यात तापाची साथ पसरली होती. त्यामुळे आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र आता तापाची साथ आटोक्यात आली आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. मात्र २० एप्रिलच्या आरोग्य विभागाच्या आदेशान्वये पुन्हा तीन नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोंभुर्णा येथे नियुक्ती देण्यात आली, त्या गावातील रूग्णालयात आरोग्य सेवा बिकट होण्याची शक्यता बळावली आहे. पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात आधीच दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. त्यात आणखी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोंभूर्णा येथे २०१२ पासून डॉ. धनगे कार्यरत आहेत. मात्र ते प्रकृतीच्या कारणाने महिन्यातून बरेच दिवस गैरहजर असतात. तर एक पद रिक्त आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडे रिक्त पद भरण्याची मागणी करून हे पद आवश्यक होते. मात्र आरोग्य विभागाने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यातच नवेगाव मोरे येथील डॉ. निलगेकर यांच्याकडे आरोग्य केंद्राचा प्रभार सोपविण्यात आला. सध्या येथे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतानाही आता आरोग्य विभागाने तोहोगाव, गडीसुर्ला आणि गोवर्धन येथील आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोंभुर्णा येथे दहा-दहा दिवस सेवा देण्याचे आदेश बजाविले आहे. २० एप्रिल रोजी देण्यात आलेल्या या आदेशात तिन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्येकी दहा दिवस दिवस आरोग्य केंद्रात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आरोग्य विभागाच्या या निर्णयाने गडीसुर्ला, तोहोेगाव व गोवर्धन येथील आरोग्य सेवा प्रभावित होईल, याचा विचार केल्याचे दिसून येत नाही. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ५८ आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र पोंभुर्णा आरोग्य केंद्रातच तब्बल पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पोंभुर्णा येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. धनगे हे प्रकृतीच्या कारणाने गैरहजर असतात. पोंभुर्णा आरोग्य केंद्र हे तालुुका मुख्यालयाचे आरोग्य केंद्र असल्याने येथे वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक होते. त्यामुळे डॉ. निलगेकर यांच्याकडे प्रशासकीय प्रभार व तोहोगाव, गोवर्धन व गडीसुर्ला येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्येकी दहा-दहा दिवस नियुक्ती देण्यात आली आहे. - डॉ. श्रीराम गोगूलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.