शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पाच कृषी उत्पादक कंपन्या वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीपुरक व्यवसायातून आर्थिक स्वावलंबी होता यावे, याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत मूल तालुक्यात तीन व सिंदेवाही तालुक्यात दोन अशा पाच कृषी कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी १८ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यातील ७५ टक्के वाटा शासन व २५ टक्के शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उचलला. कंपन्या स्थापन करताना शेतकऱ्यांनी सुमारे ५० ते ७५ गावांतील शेतकऱ्यांना भागीदार केले.

ठळक मुद्देदोन हजार शेतकऱ्यांची निराशा : विजेअभावी लाखोंची यंत्रसामग्री धूळखात

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जागतिक बँक अर्थसहाय्य व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाच कृषी कंपन्यांनी शेतमालाच्या क्लिनिंग आणि ग्रीडींग प्रकल्पासाठी यंत्रसामुग्री खरेदी केली. प्रकल्पाचा २५ टक्के आर्थिक वाटाही उचलला. मात्र, जिल्हा प्रशासन वीज पुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने कृषी कंपन्यांशी जुळलेल्या दोन हजार शेतकरी कुटुंबांचा हिरमोड झाला. शिवाय या कंपन्यांचे प्रत्येकी दोन लाख याप्रमाणे १० लाखांचा निधी अकारण अडवून ठेवल्याने लाखोंची यंत्रसामग्री धूळखात पडली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीपुरक व्यवसायातून आर्थिक स्वावलंबी होता यावे, याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत मूल तालुक्यात तीन व सिंदेवाही तालुक्यात दोन अशा पाच कृषी कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी १८ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यातील ७५ टक्के वाटा शासन व २५ टक्के शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उचलला. कंपन्या स्थापन करताना शेतकऱ्यांनी सुमारे ५० ते ७५ गावांतील शेतकऱ्यांना भागीदार केले. प्रत्येक कंपनीशी ४०० ते ५०० शेतकरी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या जुळले आहेत. कंपन्या पंजीबद्ध करून प्रकल्पासाठी लागणारा २५ टक्के म्हणजे ४.५ लाखांचा आर्थिक वाटा शेतकऱ्यांनी उचलला होता. पाचही कंपन्यांनी यंत्रसामग्री खरेदी करण्यापूर्वी टिनशेड अथवा इमारतीचे बांधकामही पूर्ण केले. त्यानंतर शेतमालाचे क्लिनिंग व ग्रिडींग करण्याची यंत्रसामग्री विकत घेतली. पण, प्रकल्पाला वीज पुरवठा नसल्याने यंत्रे धुळखात पडली आहेत.वीज पुरवठ्यांच्या दहा टक्क्यांचे काय झाले?शेतकरी उत्पादक कंपन्यांना मानव विकास योजने अंतर्गत वीज पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार १४ मे २०१९ रोजी स्वहिस्सा म्हणून १० टक्के रक्कम आरटीजीएसद्वारे वीज वितरण कंपनी मुंबई खात्यात जमा करण्यात आले. परंतु अद्याप वीज पुरवठा झाला नाही. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा शेतकरी उत्पादक महासंघाने आत्मा कार्यालय व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून समस्या जैसे थे आहे.काम चांगले तर प्रकल्प का थांबले?जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात १८ नोव्हेंबर २०१९ रोजी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठक सुरू झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ‘शेतकरी कंपन्यांचे काम चांगले आहे’ अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, वीज पुरवठाच झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी लक्षात आणून देताच जिल्हाधिकाऱ्यांनी ‘काम चांगले आहे तर प्रकल्प का थांबले’ असा उलट सवाल त्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यावेळी अधिकारी निरूत्तर झाले. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक डॉ. उदय पवार यांनी या प्रकल्पांना भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या.शेतकऱ्यांच्या आठ पत्रांनंतरही ‘नो रिस्पॉन्स’ !शेतकरी उत्पादक कंपन्यांना देय असणारे अंतिम अनुदान प्रत्येकी दोन लाख याप्रमाणे दहा लाख मिळावे, यासाठी शेतकºयांनी आत्मा प्रकल्प संचालकांकडे तब्बल आठवेळा मागणीपत्र दिले. परंतु प्रशासकीय स्तरावर नेमकी अडचण काय, यासंदर्भात आत्मा कार्यालयाने शेतकऱ्यांना दोन ओळींचे पत्रही दिले नाही. शेतकरी भागधारकांकडून भांडवल घेऊ न कंपन्या उभारण्यात आल्या. प्रकल्प सुरू करण्यास शेतकरी सज्ज असताना वीज पुरवठाच झाला नाही. त्यामुळे भागधारकांचेही मनोबल खचले. असेच सुरू राहिल्यास जिल्ह्यातील शेतकरी यापुढे हिंमत करणार नाही, अशी शंका शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.अनेक संकटे झेलून शेतकऱ्यांनी कृषी कंपन्या स्थापन केल्या. शेतकरी भागधारकांकडून घेतलेल्या प्रत्येक रूपयाचा अत्यंत काटेकोरपणे प्रकल्पासाठी वापर केला. त्यामुळे पायाभूत कामे केली. भागधारक शेतकरी याच कामांकडे पाहून आमच्यावर विश्वास ठेवत आहेत. परंतु असे किती दिवस चालणार? वीज पुरवठा झाला असता तर शेतमालाच्या क्लिनिंग व ग्रीडींगचे काम सुरू झाले असते. यातून शेतकºयांना लाभ झाला असता.-प्रकाश खोब्रागडे, जिल्हा शेतकरी उत्पादक महासंघ, चंद्रपूर