शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

विषारी पाण्यामुळे तलावातील मासोळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:41 IST

सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील नान्होरी येथील दोन हेक्टर २८ आर जागेवर पसरलेल्या पंचगंगा मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या तलावात धानपिकावर फवारणी करण्यात आलेले विषारी औषधीयुक्त पाणी आल्याने तलावातील लाखो रुपयांच्या मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे सोसायटीचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत.त्यामुळे त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ मृत्युमुखी पडलेल्या मास्यांचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सोसायटीच्या सभासदांनी केली आहे.तलावाच्या आजूबाजूला असलेल्या अज्ञात शेतकऱ्याच्या शेतातील फवारणी करण्यात आलेले औषधीयुक्त पाणी तलावात आल्याने सदर मास्यांचा मृत्यू झाला असल्याचे सोसायटीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.तीन-चार दिवसाआधी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पाणी अधिक वाढल्याने सदर औषधीयुक्त पाणी तलावात आले आणि सदर औषधीयुक्त पाणी तलावाच्या पाण्यात मिसळले. त्यामुळे तलावात सोडण्यात आलेल्या मास्यांचा मृत्यू झाला, असे सोसायटीच्या सदस्यांचा आरोप आहे.दरम्यान, सरपंच, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत मृत्युमुखी पडलेल्या मास्यांचा पंचनामा करण्यात आला असून सदर पंचनाम्याची प्रत मत्सव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे सोसायटीच्या सभासदांनी सांगितले आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण