शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

रिंग रोडसाठी जागेचा पर्याय शोधावा

By admin | Updated: April 4, 2015 00:32 IST

चंद्रपूर महानगराच्या बाहेरून रिंग रोड (बायपास रोड) अत्यंत आवश्यक आहे.

रिंग रोड हवाच : नागापुरे यांची मागणीचंद्रपूर : चंद्रपूर महानगराच्या बाहेरून रिंग रोड (बायपास रोड) अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने त्यासाठी जागेचा पर्याय शोधावा, अशी मागणी नगरसेवक अशोक नागापुरे यांनी केली आहे.चंद्रपूर हे महानगर व औद्योगिक शहर आहे. शहरातील लोकसंख्येची घनता जास्त आहे. संपूर्ण शहर दाट लोकवस्तीचे झाले आहे. मात्र दळणवळणाच्या दृष्टीने शहरातील रस्ते गैरसोयीचे आहेत. जडवाहनांची वाहतूक शहराच्या मुख्य रस्त्यावरूनच होते. जडवाहनांची वाहतूक ही जीवघेणी ठरत आहे. अपघातात अनेकांचा बळी जात आहे. त्यामुळे जडवाहनांची वाहतूक शहराच्या सीमेलगतच्या ट्रायस्टार हॉटेल ते वीज केंद्राच्या संरक्षण भिंतीला लागून पुढे लॉ कॉलेज जवळून कॉलरी रोड मार्गे वनराजीव महाविद्यालयापर्यंत व्हावी. त्यासाठी हा बायपास रोड व्हावा. राज्य महामार्ग यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. तत्कालीन चंद्रपूर नगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार १९८४ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावेळी या प्रस्तावित बायपास रोडवर फक्त १४ घरे होती. त्या प्रस्तावाला धरूनच हा रिंग रोड चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पूर्ण करावा व जीवहानी टाळावी, ही याचिका सादर करण्यामागचा हेतू आहे, असे नागापुरे यांनी म्हटले आहे. आजच्या स्थितीत पूर्वीच्या प्रस्तावित बायपास रोडवर शेकडो घरे झाली आहेत. असे जर असेल तर रिंग रोडसाठी पर्याय शोधावा. मात्र शहराच्या बाहेरूनच रिंगरोड होणे गरजेचे आहे. लोकांच्या घरांचे नुकसान व्हावे, हा हेतू मुळीच नाही. मनपा पूर्वीच्या नगर परिषदेच्या विलंबामुळे आजची स्थिती कदाचित उद्भवली असेल, असेही नागापुरे यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)