शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मृत पाणवठे शोधून ते जिवंत करण्यासाठी ‘झेप’ची धडपड

By admin | Updated: April 18, 2016 01:06 IST

यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यातच सूर्य आग ओकत आहे. परिणामी नैसर्गिक जलस्रोत कोरडे

घनश्याम नवघडे ल्ल नागभीडयावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यातच सूर्य आग ओकत आहे. परिणामी नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडत आहे. या वातावरणात जंगलातील पशुपक्ष्यांची चांगलीच परवड होत आहे. ही परवड थांबावी, यासाठी येथील ‘झेप’ या निसर्ग संस्थेने जंगलातील मृत पाणवठे शोधून ते जिवंत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. झेपच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.नागभीड तालुका जंगलव्याप्त आहे. या तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणावर असल्याने पशुपक्ष्यांची संख्याही भरपूर आहे. गेल्या काही वर्षात जंगली श्वापद आणि मानवी संघर्षाच्या अनेक घटनासुद्धा घडल्या आहेत. याला विविध कारणे असली तरी उन्हाळ्याच्या दिवसात हे संघर्ष होण्यास ‘पाणी’ हे एक प्रमुख कारण आहे.या पशुपक्ष्यांना जंगलाच पाणी उपलब्ध व्हावे. त्यांची पाण्यासाठी परवड होऊ नये, यासाठी येथील झेप ही निसर्ग संस्था पुढे सरसावली आहे. येथील वनविभागाच्या सहकार्याने जंगलातील जुने साठे शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसात अस्वल ज्या ठिकाणी बसून आराम करते, अश्या जागा शोधून त्या ठिकाणी काही फुट जागा खोदून पाणवठे तयार करीत आहेत.आतापर्यंत या निसर्ग संस्थेने नागभीड तालुक्यातील जंगल परिसरात अनेक ठिकाणी असे पाणवठे श्रमदानातून तयार केले आहेत. झेप या निसर्ग संस्थेने आजवर अनेक उपक्रमे राबविली. पण जंगली पशुपक्ष्यांसाठी मृत पाणवठे शोधून ते जिवंत करण्याच्या या उपक्रमांची खरोखरच प्रशंसा होत आहे. ‘झेप’चे अध्यक्ष पवन नागरे, उपाध्यक्ष अमोल वानखेडे, सचिव अमित देशमुख, समीर भोयर, नरेंद्र लोहबरे, वीरेंद्र गजभे, आशिष कुमरे, सतीश चारथड, अभिजित गोहणे या झेपच्या कार्यकर्त्यांनी या कामी स्वत:ला वाहून घेतले आहे.उन्हाळ्याच्या दिवसात अस्वल ज्या ठिकाणी बसते. त्या खाली पाणी साठा निश्चित असतो असा परंपरागत समज आहे. असे ठिकाण आम्ही शोधून काढले व त्या ठिकाणी काही फूट जागा खोदली. खरोखरच त्या ठिकणी पाणी लागले. या कामी आम्हाला वनविभागाचेही सहकार्य लाभले.- अमित देशमुख, उपाध्यक्ष ‘झेप’ निसर्ग संस्था, नागभीड