शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या पुनर्गठनाअभावी आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

खरीप व रब्बी हंगामात कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात लक्षणीय आहे. सन २०१९-२० या वर्षात पंधराही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कृ षी कर्ज घेतले. नापिकीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर २०१९ पूर्वीचे कर्ज थकित आहे. या कर्जाचे पुनर्गठन करून कर्जाचा भरणा केल्यानंतर दरवर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिल्या जाते.

ठळक मुद्देबँकांकडून वसुलीचा तगादा : पुनर्गठनाची मुदत संपली, रबीसाठी कर्ज मिळण्यास अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासोबतच संपूर्ण कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे जुन्या कर्जाचे पुनर्गठन करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरला संपली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. मात्र, बँकांनी थकित कर्ज वसुलीचा तगादा सुरूच ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.खरीप व रब्बी हंगामात कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात लक्षणीय आहे. सन २०१९-२० या वर्षात पंधराही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कृ षी कर्ज घेतले. नापिकीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर २०१९ पूर्वीचे कर्ज थकित आहे. या कर्जाचे पुनर्गठन करून कर्जाचा भरणा केल्यानंतर दरवर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिल्या जाते. कर्ज पुनर्गठन करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांमध्ये संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात. गतवर्षीपासून ही कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्याचा नियम लागू करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. ग्रामीण भागात इंटरनेट व विजेची समस्या असल्याने शेतकऱ्यांना तालुकास्थळी चकरा माराव्या लागल्या.परिणामी, खरीप हंगामादरम्यान शेतकरी त्रस्त झाले होते. जुन्या कर्जाचे पुनर्गठन झाले नाही तर नवीन कृषी कर्ज मिळण्याचे सर्वच मार्ग बंद होतात. या धास्तीने शेतकऱ्यांनी मोठे दिव्य पार करून ऑनलाईन कागदपत्रे अपलोड केली. दरम्यान, शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. परंतु, हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही. खरीप हंगामातील पिके आता हाती येण्याच्या स्थितीत असताना परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केले. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता कृषी कर्ज मिळेल, या आशेने शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. पण, ३१ ऑक्टोबरला संपल्याने नवीन कर्ज मिळण्याचे मार्ग बंद झाले आहेत. परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याने हा प्रश्न सोडविण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.मुदत वाढवावीखरीप हंगामातील पिकांना जोरदार फटका बसूनही दिवस पालटतील या आशेने शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेकडो शेतकरी कृषी कर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळवा करत आहेत. नवीन शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची आशा आहे. मात्र, थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन न झाल्याने समस्या निर्माण झाली. त्यामुळे पुनर्गठनाची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज