शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शेतकऱ्यांना मिळाले पाणी

By admin | Updated: September 1, 2016 01:28 IST

मागील अनेक दिवसांपासून पाण्याने पाठ फिरविल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हातात आलेले पीक वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे

मुनगंटीवार यांचे प्रयत्न : शेतकऱ्यांचे विद्युत बिल माफमूल : मागील अनेक दिवसांपासून पाण्याने पाठ फिरविल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हातात आलेले पीक वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही बाब माहीेत होताच त्यांनी पाणसाऱ्यापैकी ४१ लाख रुपयांचा भरणा करुन शेतीसाठी हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून सात गावातील शेकडो शेतकऱ्यांना हरणघाट उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळत आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष चंदू मारगोनवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील दर्पण सार्वजनिक वाचनालयामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मारगोनवार पुढे म्हणाले, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पाअंतर्गत बोरचांदली, राजगड, विरई, फिस्कुटी, गडीसुर्ला, जुनासूर्ला आणि बेंबाळ ही सात गावे आहेत. मागील अनेक वर्षापासून सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे या भागातील शेतकऱ्यांकडे हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पाण्यासाराची रक्कम थकीत आहे. ही थकबाकी सुमारे एक कोटी २५ लाखांपर्यंत गेली आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीला दाखविलेला जोर आता ओसरला आहे. पाण्याअभावी पीक करपायला लागली आहे. अनेकांचे तर अजून रोवणेही बाकी आहे.शेतकऱ्यांनी हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याची विनंती केली. परंतु जुन्या थकीत रकमेमुळे पाणी सोडण्यास नकार दिला. अशा स्थितीत शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असल्याने हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन परिसरातील शेतकऱ्यांनी मुनगंटीवार यांना दिले. निवेदनातून शेतकऱ्यांनी मांडलेली अडचण लक्षात घेऊन त्यांनी शासनाच्या देखभाल दुरुस्ती निधीतून ४१ लाख रुपये भरणा केली आणि उपसा जलसिंचन प्रकल्पातून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुनगंटीवार यांच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यामुळे या परिसरातील शेतकरी पार भारावून गेल्याचेही मारगोनवार यांनी यावेळी सांगितले. सदर प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले असल्यामुळे शेवटच्या टोकावर वसलेल्या दिघोरी या गावापर्यंत पाणी पोहचत आहे. या प्रकल्पाच्या नहराचेही काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश ना. मुनगंटीवार यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. पत्रकार परिषदेला चांदापूरचे माजी उपसरपंच राजू पोटे, भाजयुमोचे महामंत्री दिलीप पाल, नवथाव वाढई, अभिषेक पोरेड्डीवार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)