शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

महाऔष्णिक केंद्राविरूद्ध गुन्हे दाखल

By admin | Updated: August 19, 2016 01:50 IST

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून इरई नदी रसायनयुक्त पाणी सोडल्याने प्रदूषण झाले होते.

इरईचे प्रदूषण : पर्यावरणवाद्यांची तक्रार चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून इरई नदी रसायनयुक्त पाणी सोडल्याने प्रदूषण झाले होते. याप्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या प्रशासनाविरोधात दुर्गापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तुकूम परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रातील हौदात मोठ्या प्रमाणावर लाल रंगाचे पाणी बुधवारी सकाळी जमा झाले. पर्यावरणवाद्यांना कुंदन प्लाझा हॉटेलजवळून वाहणाऱ्या नाल्यातून हे लाल रंगाचे पाणी येवून इरई नदीच्या प्रवाहात मिसळत असल्याचे दिसले. याबाबत ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, सचिन वझलवार, इको-प्रो संघटनेचे बंडू धोतरे यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. पर्यावरणवाद्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी केल्या. (प्रतिनिधी) दुर्गापूर पोलिसांनी नोंदविले गुन्हे चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातून पाणी सोडण्यात आल्याने इरई नदीचे पाणी प्रदूषित झाले. त्याबाबत ग्रीन प्लॅनेटने दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून निर्मिती कंपनीच्या प्रशासनाविरोधात भादंवि कलम ३३३, मुंबई कायद्याअंतर्गत कलम १०८, ११७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.