शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या हंगामात निवडणुकीची रणधुमाळी

By admin | Updated: July 12, 2015 01:16 IST

४ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.

सावली : ४ आॅगस्ट रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. ऐन शेतीच्या हंगामात निवडणूका आल्याने या निवडणुकीत वेगळीच रंगत येणार असल्याचे बोलले जात आहे.सावली तालुक्यातील ५५ ग्रामपंचायती पैकी ५० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका व दोन ग्रामपंचायतीची पोट निवडणूक येत्या ४ आॅगस्टला होणार आहे. नामनिर्देशन पत्र पहिल्यांदाच आॅनलाईन भरावे लागत असल्याने उमेदवारांमध्ये कमालीचे औस्त्युक्य आणि तेवढाच गोंधळ निर्माण झाला आहे. १३ ते २० जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्र भरावयाचे आहे. संबंधित संकेतस्थळार सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.सावली तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्याने सावली येथील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. सावली नगर वगळता एकूण ६७ हजार ७०६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ३३ हजार १२८ महिला व ३४ हजार ५७८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. शेतीच्या हंगामात निवडणूका आल्याने मतदारांना सुवर्णसंधी चालून आली आहे. शेतीच्या मजुरीवर जायचे की मतदान करायचे या द्विधा मन:स्थितीत असणाऱ्या मतदारांची नाळ ओळखण्यात सर्वच पक्ष प्रमुख तरबेज असले तरी मतदान आपल्या बाजुने करण्यासाठी पक्षांना कसरतच करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)